पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध उत्खनन प्रकरण तापले काशिनाथ जगताप करणार तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण

SHARE NOW

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):

दिनांक २७ सप्टेंबर २०२५ पिंपरी:- चिंचवड शहरात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात तब्बल २००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ संभाजी जगताप यांनी अप्पर तहसीलदारांवर गंभीर आरोप करत तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा दिला असून विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी व प्रांत यांना पत्र व्यवहार करून येत्या १० ऑक्टोबर रोजी अप्पर तहसील कार्यालयासमोर उपोषण करणारा असल्याची माहिती जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisement

 

जगताप यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २ वर्षापासून अवैध गौण खनिज उत्खननाचे १०८ पेक्षा अधिक प्रकरणे अप्पर तहसील कार्यालयाकडे देऊनही अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट बिल्डर व डेव्हलपर्स यांना नोटीस न पाठवता व तक्रारदारांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय देऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला असून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले आहे.

 

या प्रकरणात लवकरात लवकर चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्ताकडे, जिल्हाधिकारी व प्रांत यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा १० सप्टेंबर २०२५ रोजी अप्पर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा काशिनाथ जगताप यांनी दिला आहे.

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page