लोनावळा खंडाळा घाटमाथ्यावर टॅक्सी संघर्ष तीव्र; ओला-उबेरविरोधात चालकांचे साखळी उपोषण, प्रशांत दादा भागवत यांनी उपोषण स्थळी भेट देत पाठिंबा दिला

SHARE NOW

लोनावळा :

लोनावळा-खंडाळा घाटमाथ्यावर स्थानिक टॅक्सी व्यवसायाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला असून, ओला-उबेर-रॅपिडोविरोधात चालकांचा संताप उफाळून आला आहे. ‘लोणावळा-खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटना’च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तीन दिवसीय साखळी उपोषणाला बुधवारी सुरुवात झाली. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भागवत यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

ऑनलाइन टॅक्सी सेवांचा वाढता शिरकाव, दरांमधील अस्थिरता आणि बाहेरील वाहनांची वाढती संख्या यामुळे स्थानिक चालकांचे उत्पन्न घटल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. “आमच्या हक्काच्या व्यवसायावर गदा येत आहे,” अशी भूमिका आंदोलक चालकांनी मांडली.

Advertisement

उपोषणस्थळी मोठ्या संख्येने चालकांची उपस्थिती दिसून येत असून घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व स्थानिक नेत्यांचाही पाठिंबा मिळत असल्याने प्रशासनावर दबाव वाढताना दिसत आहे.

 

संघटनेने शासनाकडे ऑनलाइन टॅक्सी सेवांवर निर्बंध आणण्याची, स्थानिक चालकांना प्राधान्य देण्याची आणि नियमबाह्य व्यवसायावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका जाहीर केलेली नसली तरी या संघर्षाचे पडसाद पर्यटननगरीच्या वाहतूक व्यवस्थेवर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page