महावीर जयंती निमित्त भव्य आरोग्य शिबिर संपन्न
तळेगाव दाभाडे :
अहिंसेचे पुजारी श्री भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.
यामध्ये 70 लोकांचे डोळे तपासून त्यामध्ये मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच 176 लोकांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली तर 120 लोकांचे हाडाचा ठिसूळपणा याची चाचणी करण्यात आली 49 लोकांनी रक्तदान करून या आरोग्य शिबिरास प्रचंड असा प्रतिसाद शहरातील नागरिक व जैन बांधवांनी दिला.
आरोग्य शिबिरास माजी नगरसेवक श्री प्रकाश ओसवाल जैन मंदिराचे विश्वस्त अनिल मेहता,भवरमल संघवी,दिनेश वाडेकर,रोटरी सिटी चे चार्टर प्रेसिडेंट विलास काळोखे,दिलीप पारेख,भगवान शिंदे,प्रशांत ताये,प्रदीप टेकवडे यांनी भेट दिली.
माय मर मेडिकल कॉलेजचे पथक यांनी अतिशय व्यवस्थित नियोजन करून शिबिर उत्तमरीत्या पार पाडले.
सर्व पाहुण्यांचे स्वागत रोटरी सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन राकेश ओसवाल,विनोद राठोड,राजेंद्र शहा,इंदर सोलंकी,समीर परमार,भरत राठोड,संजय सोलंकी,निलेश जैन,घनश्याम राठोड,संजय ओसवाल यांनी केले.
मायमर मेडिकल कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी राहुल पारगे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.