तंत्रज्ञान स्पर्धेतून मिळते तांत्रिक कौशल्यांना चालना – डॉ. प्रमोद पाटील पीसीसीओईआर आयोजित ‘रोबोराष्ट्र’ स्पर्धेत केपीआर, राजराजेश्वरी, नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल संघ प्रथम

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. ०८ फेब्रुवारी २०२५) रोबोराष्ट्र सारख्या स्पर्धा तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तांत्रिक कौशल्यांना चालना मिळते. तसेच आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या जगात आवश्यक असलेल्या टीकात्मक विचारसरणी आणि सांघिक प्रयत्नांना प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांनी रोबोटिक्समध्ये नवीन शक्यतांचा शोध घेत राहिले पाहिजे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पीसीईटी संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चच्या वतीने ‘रोबोराष्ट्र २५’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील महाविद्यालयांतील १०१ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रेस्क्युलर ऑलिंपिक, यंत्रोत्सव सिनियर, ज्युनिअर या तीन विभागांत स्पर्धा झाली. युविरा ३ केपीआर कोईम्बतुर, पिनाकल माइंड्स राजराजेश्वरी अभियांत्रिकी महाविद्यालय, बेंगळुरू, रणवीरसिंग राजपूत नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, संगणक विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, डॉ. महेंद्र साळुंके आदी उपस्थित होते.

स्पर्धेमुळे तांत्रिक कौशल्ये, समीक्षात्मक विचारसरणी आणि सांघिक प्रयत्नांना प्रोत्साहन मिळते. सहभागी विद्यार्थ्यांना नवीन शक्यतांचा शोध घेण्यास मदत होऊन लक्षणीय प्रगती होऊ शकते, असे डॉ. अर्चना चौगुले म्हणाल्या.

Advertisement

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेतील विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे संयोजन डॉ. महेंद्र साळुंके, आदित्य परदेशी, ओम खरे, खुशी रोहरा, चंद्रकांत राऊत आणि इतर समिती सदस्यांनी केले.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे –

रेस्क्युलरऑलिंपिक – प्रथम क्रमांक – युविरा ३ (केपीआर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था केपीआरआयईटी कोईम्बतुर); व्दितीय क्रमांक – सम्यंक घंगाळे (डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय‌ आकुर्डी) आणि तृतीय क्रमांक – युविरा झेड (केपीआर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था कोईम्बतुर) तसेच यंत्रोत्सव सिनियर टीम – प्रथम क्रमांक – पिनाकल माइंड्स (राजराजेश्वरी अभियांत्रिकी महाविद्यालय, बेंगळुरू), व्दितीय क्रमांक – बीओटी (डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी) आणि तृतीय क्रमांक – रोबोयुश (वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली); यंत्रोस्तव ज्युनियर टीम – प्रथम क्रमांक रणवीरसिंग राजपूत नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल, व्दितीय क्रमांक – अर्जुन आनंद अरबुज (प्रियदर्शिनी स्कूल) आणि तृतीय क्रमांक – वॉर मशीन जेएन पेटिट टेक्निकल हायस्कूल यांना मिळाला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page