*सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील अभिमानास्पद कार्य*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

Advertisement

२७ जानेवारी ते ३फेब्रुवारी २०२५ दरम्यान तामिळनाडू येथील डायमंड राष्ट्रीय स्काऊट गाईड डायमंड जांबोरी येथील देशभरातून ४ देशातून आणि २७ राज्यातून शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यात महाराष्ट्राने मिळवली एकूण २० पारितोषिकं.महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकूण ६ शाळांची निवड करण्यात आली होती. मावळ विभागातून सह्याद्री इंग्लिश स्कूल मधल्या सहशिक्षिका यशश्री आलम यांच्या मार्गदर्शनात ऋतुजा सोनार, गौरी शिंदे, प्रांजल शेवाळे, विशाखा नाईक, गायत्री भेगडे,रुचिता जाधव,अपूर्वा सोनटक्के, प्रणिषा मनवर,या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. हा कॅम्प अतिशय भव्य प्रमाणात नियोजित केला होता. प्रत्येक दिवसाचे वेगवेगळ्या स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. अँडवेन्चर अँक्टीविटी, ग्लोबल डेव्हलपमेंट विलेज, ईंटेग्रेटी अँक्टीव्हीटी ,फन गेम ई.मध्ये महाराष्र्टातील स्काऊट गाइडनी खुप एंजाॅय केला.महाराष्र्ट दिन* हा तामिळनाडुच नव्हे तर भारताला भूरळ घालणारा ठरला.महाराष्र्ट राज्य हे सर्वच बाबतीत महान आहे हे पुन्हा एकदा महाराष्र्टाच्या स्काऊट गाईड व स्काऊटर गाईडर यानी सिध्द केले. 11 स्पर्धेत प्रथम क्रमाक, 8 स्पर्धेत द्वितीय तर एका स्पर्धेत तृतिय क्रमाकांचे पारितोषिक मिळवून महाराष्र्ट राज्याने तामिळनाडुत आपला ठसा उमठवला.मार्चपास्ट, ग्रँड कॅम्प फायर, कलरपार्टी, लोकनृत्य, रांगोळी, फुडप्लाजा, कँम्प क्राप्ट, ईथेनिक शो, पिजंट शो (शोभायाञा), फिजीकल डिस्पले, स्किल ओ रामा ह्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले. सह्याद्री स्कूल मधील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अशी संधी मिळाल्याने आता कुठल्याही परिस्तिथीत घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे बळ त्यांना या कार्यक्रमाने दिले. त्यांचे विशेष कौतुक होत आहे. मुख्याध्यापिका व संस्थापक सर्व सदस्य यांनी त्यांचे कौतुक केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page