नूतन अभियांत्रिकीला बँकॉकमध्ये जागतिक एआय शिक्षण पुरस्कार डॉ. प्रमोद पाटील यांची तज्ज्ञ वक्ते म्हणून निवड

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (एनएमआयईटी)ने जागतिक शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. बँकॉक येथे आयोजित जागतिक शिक्षण परिषद २०२६मध्ये संस्थेला ‘एआय-सक्षम शिक्षणातील उत्कृष्टता पुरस्कार’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, याच परिषदेत संस्थेचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांना तज्ज्ञ वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

 

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, तंत्रज्ञानाधिष्ठित शैक्षणिक वातावरणाची निर्मिती आणि भविष्योन्मुख शिक्षणव्यवस्था विकसित करण्यासाठी संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

 

परिषदेदरम्यान डॉ. प्रमोद पाटील यांनी ‘ बियोंड बॉर्डर्स : रिमेनिंग द फियुचर ऑफ इंडो –थाय हाय्यर एज्यूकेशन ’ या विषयावरील विशेष सत्रात सहभाग घेत भारत आणि थायलंडमधील उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य, शैक्षणिक आंतरराष्ट्रीयीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित शिक्षण आणि भविष्यातील शैक्षणिक परिवर्तन याविषयी आपले विचार मांडले. त्यांच्या मांडणीला विविध देशांतील शिक्षणतज्ज्ञ आणि प्रतिनिधींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Advertisement

 

स्वायत्त दर्जा प्राप्त एनएमआयईटी संस्था आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख शिक्षण यांवर विशेष भर देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल परिवर्तन क्षेत्रात विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जात आहे. असे प्रतिपादन अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी केले. आणि आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

 

या यशामागे संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, , उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि संचालक डॉ. प्रमोद पाटील यांचे दूरदर्शी नेतृत्व व मार्गदर्शन लाभले आहे. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य, संशोधनाच्या नव्या संधी, कौशल्यविकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगत ज्ञानासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

 

या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला असून हा सन्मान संपूर्ण एनएमआयईटी परिवारासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page