युवकांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू
तळेगाव दाभाडे : आजच्या आधुनिक युगात रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी कौशल्य विकास हि काळाची मोठी गरज बनली आहे. याच उद्देशाने ए.सी.जी. व मिटकॉन कौशल्य विकास केंद्र तर्फे विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण केवळ मोफत नसून, पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र व नोकरीसाठी मदत देखील केली जाणार आहे. युवक-युवतींसाठी ही एक अप्रतिम संधी आहे.
या उपक्रमांतर्गत खालील कोर्सेस उपलब्ध आहेत
AutoCAD, CNC व VMC ऑपरेटर प्रशिक्षण – अभियांत्रिकी व तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त.
टू व्हिलर व इलेक्ट्रिक वाहन टेक्निशियन प्रशिक्षण – वाढत्या ई-वाहन बाजारपेठेत मागणी असलेले कौशल्य.
घरगुती इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षण फॅन, मिक्सर, इस्त्री, वॉटर फिल्टर, मोटर इत्यादी उपकरणांचे मेंटेनन्स शिकवले जाईल.
या सर्व प्रशिक्षणाचा कालावधी २ महिने असून, दररोज २ ते ३ तासांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन सत्र घेतले जाईल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त सर्टिफिकेट मिळेल तसेच नोकरीसाठी मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून दिली जाईल.
पात्रता: किमान शिक्षण १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वय १८ ते ४५ वर्षे या दरम्यान असावे.
ठिकाण: ए.सी.जी. व मिटकॉन कौशल्य विकास केंद्र,
(नवीन नगरपरिषदेच्या शेजारी, अभ्युदय बँकेच्या वर, आदर्श कॉलेजजवळ, तळेगाव दाभाडे).
संपर्क क्रमांक: 89994 54421 | 98226 65049 | 70576 49060
या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवणे, तांत्रिक कौशल्य वाढवणे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल घडवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षकांकडून अत्याधुनिक उपकरणांवर प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. ग्रामीण व शहरी युवकांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अर्ज करणाऱ्यांना संस्थेच्या कार्यालयातून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत संपर्क साधला जाईल.
“शिका – सर्टिफिकेट मिळवा नोकरी व व्यवसायात प्रगती करा.हि संधी आहे
नवीन कौशल्य शिकण्याची आणि उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकण्याची.






