सासवडला कारवाईसाठी ट्रक पकडलेला ट्रक सोडवायला राजगडचे कर्मचारी यांना कोणाचा फोन आला…?तो सासवडचा पोलीस उपनिरीक्षक कोण..?संशयास्पद कारवाईचा तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश..

SHARE NOW

सासवड –

पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सासवड रोडने जाणारा एक संश्यास्पद मालवाहतूक ट्रक सासवड पोलिसांनी पकडला व तीन तासाने सोडल्याची चर्चा पुणे जिल्ह्यात झालेली पाहायला मिळाली होती

*सासवड पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे व सासवड पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांची चौकशीची संबंधित संघटना करणार..*

पोलिस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सासवडच्या संबंधित विषयाची चौकशी करणे कमी तक्रारदार यांचा अर्ज पाठविण्यात आला होता तो अहवाल वरिष्ठांना समाधानकारक नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

*राजगड कर्मचारी गाडी सोडायला हस्तक्षेप का करत होते ट्रक मध्ये काय होते या संश्यास्पद कारवाईबाबत होणार पुन्हा चौकशी*

सासवड पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिहं गौर यांच्याकडे सविस्तर चौकशी अहवाल तीन दिवसात वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे आदेश आले असल्याची प्राथमीक माहिती मिळाली आहे

Advertisement

*सासवड पोलिसांनी ट्रक पकडला ही खबर राजगड कर्मचारी अक्षय नलावडे यांना कशी..?तो ट्रक सोडविण्यासाठी कोणाचा फोन आला*

संबंधित गंभीर विषयामध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी राजगड कर्मचारी अक्षय नलावडे यांना सासवड मध्ये ट्रक पकडल्यावर कोणाचा फोन आला काय होते त्या ट्रक मध्ये त्या ट्रकचा मालक कोण आहे तो ट्रक कुठून आला होता कुठे चालला होता व सासवड येथील पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनावणे,त्यांच्या सोबत असणारे पोलीस कर्मचारी यांची स्टेशन डायरी नोंदसहीत सविस्तर चौकशी केली नसल्याने संबंधित संघटनेने यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सासवडच्या विषयामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिहं गिल्ल हे कडक चौकशी करणार असल्याचे बोलले जात आहे तीन दिवसात दिनांक १६/०८/२०२५ वार शनिवार पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून दोषी आढल्यास कडक कारवाई करणार असल्याचे माहिती समोर आली आहे


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page