*संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन*
मावळ :

मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते १६ ऑगस्ट रोजी पवणा धरणावर जाऊन खणा नारळाने ओटी भरून पवनामाईचे जलपूजन करण्यात आले पवणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मावळ वासियांची तसेच पिंपरी चिंचवड करांची वर्षभराची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे तसेच शेतकरी सुखावला आहे त्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पवना धरणावर येऊन पाण्याची पूजा केली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित कुंभार यांनी केले रणजीत बारिया यांनी पवना धरणाची माहिती दिली तसेच पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा यासाठी जल शप्पत देण्यात आली माझे सभापती ज्ञानेश्वर दळवी धरणग्रस्त अध्यक्ष रविकांत रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्याकरिता पुन्हा एकदा शासकीय पातळीवर धरणग्रस्त संघटना व शासनाची बैठक आयोजित करू असे सांगितले तसेच पवना धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राखीव पाच टक्के कोटा हा फक्त पवना धरणग्रस्तांच्या मुलांसाठी वापरण्यात यावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत तसेच धरणग्रस्त च्या मुलांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्याकरिता कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे असे सांगितले तसेच पवना धरणातील गाळ काढल्याने पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे तसेच पवना धरणापासून ते पिंपरी चिंचवड पर्यंत पवना नदी सुधार प्रकल्प कार्यक्रम साठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले व पवन मावळातील अनेक गावातील प्रलंबित प्रश्नांकरिता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देण्यात आले माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर उपजिल्हाप्रमुख शरदराव हुडावळे रिपाई अध्यक्ष नारायण भालेराव तालुका प्रमुख शिवसेना राजेश खांडभोर उद्योजक वाळुंज धरणग्रस्त अध्यक्ष रविकांत रसाळ पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी रजनीश बारिया तालुका संघटक अमित कुंभार उपतालुकाप्रमुख राम सावंत धनंजय नवघणे चंद्रकांत भोते विशाल हुलावले गणेश ठाकर शक्ती जवेरी अल्ताफ शेख देव खरटमल सुदर्शन देसले नवनाथ हरपुडे, सरपंच प्रकाश सावंत, आदिवासी अध्यक्ष अंकुश वाघमारे अंकुश आखाडे लहू आखाडे बबनराव कालेकर सरपंच शाहिदास निंबळे चिंतामण कोंढरे बाळासाहेब कालेकर रवी घरदाळे व अनेक नागरिक उपस्थित होते






