लायन्स क्लब ऑफ तळेगावचा नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा शपथविधी संपन्न
तळेगाव दाभाडे :
नवनिर्वाचित लायन अध्यक्ष राजेंद्र झोरे- सेक्रेटरी लायन डॉक्टर चेतन ओसवाल आणि ट्रेझरर लायन विनीत चिटणीस यांच्यासह- संचालक मंडळाचा शपथविधी समारोह लायन्स क्लब तळेगाव येथील वास्तूत ओसंडून वाहणाऱ्या सभागृहातील- हितचिंतकांच्या उपस्थितीत अतिशय देखण्या स्वरूपात संपन्न झाला! शपथविधी समारंभाचे चेअर पर्सन- लायन मयूर राजगुरव लायन प्रमिला वाळुंज आणि त्यांच्या सर्व टीमचं क्लब तर्फे- पी डी जी लायन दीपकभाई शहा यांनी अभिनंदन आणि आभार व्यक्त केलेत! विद्यमान आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या शुभहस्ते- कॉन्फरन्स हॉलमधील- छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच आणि जिम मधील -छत्रपती धर्मवीर संभाजी राजे -यांच्या प्रतिमेचं विधिवत अनावरण करण्यात आलं! लायन्स क्लब ला- छत्रपती शिवरायांची मूर्ती लायन एडवोकेट मनोहर दाभाडे आणि धर्मवीर संभाजी राजेंची प्रतिमा ही- लायन भरत पोतदार या उभयतांच्या सौजन्याने प्राप्त झाली म्हणून- उभयतांचाही यथोचित सत्कार करण्यात आला! गेल्या वीस वर्षातील लायन्स क्लब तळेगाव संचलित- हेल्थ क्लबची उत्कृष्ट सर्वांगीण झालेली प्रगती पाहिल्यानंतर- कर्मयोगी आमदार सुनील आण्णा शेळकेनी- लायन्स क्लब तळेगावच्या कार्यकर्तृत्वाच आपल्या मनोगतात भरभरून कौतुक करून- भविष्यातील लायन्स क्लबच्या विविध प्रकल्पास- शासनाकडून निश्चितच सहकार्य केले जाईल असे- आमदारांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले ! शपथविधी समारंभाचे मुख्य पाहुणे- लायन द्वारकाजी जालन यांचा परिचय- अत्यंत उत्कृष्ट शब्दात लायन शैलेश शहा यांनी करून दिला! त्यानंतर जागरूक रसिक श्रृत्यांना- हसत खेळत- अंतर्मुख- करीत करीत- मानवी जीवन मूल्यांचा – द्वारकाजींनी आपल्या खुसखुशीत विनोद शैलीतून- परिचय करून दिला!माजी प्रांतपाल- लायन डॉक्टर दीपकभाई शहा नवीन टीमला लायन परिवारातर्फे अंतकरणापासून शुभेच्छा दिल्यात! नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्रजी झोरे यांनी लायन्स क्लबने- आपल्याला समाज सेवेची ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल क्लबचे मनःपूर्वक आभार मानलेत तसेच अध्यक्ष पदावर विराजमान होतान आपल्या मनात सेवा कार्य हीच भावना आहे हे नमूद केले सुख मिलाप- म्युझिकल स्टार या अंधसंस्थेला त्यानी आर्थिक मदत देऊ केली. बॅडमिंटन कोच- युवराज पारगे- उत्कृष्ट स्पर्धक कुमार पवार यांना- बॅडमिंटन टेबल टेनिस!- कराटे कोच- प्रफुल्ल कवळे- उत्कृष्ट स्पर्धक- कुमार शेलार!- स्केटिंग शिक्षक राहुल लोंबार -उत्कृष्ट- स्पर्धक कुमार चव्हाण- या सर्वांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते विशेष सत्कार करण्यात आला ! तळेगाव स्टेशन स्थित- लायन् श्रीकांत लोमटे यांच्या सौजन्याने- जवळजवळ दहा हजार स्केअर फुट असलेला भूभाग- जो भविष्यात- लायन्सच्या विविध ऍक्टिव्हिटीसाठी आवश्यक आहे अशा भूभागाचा- दस्तऐवज हा उपस्थितांच्या साक्षीनं अध्यक्ष राजेंद्र झोरे यांनी- क्लब तर्फे स्वीकारला! या- विविध ऍक्टिव्हिटीने नव्या टीमची उत्कृष्ट सुरुवात करण्यात आली! लायन राधेश्याम भंडारी आणि लायन अनिता बाळसराफ यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने क्षणाक्षणाला कार्यक्रमाची उंची वाढतच गेली! सुग्रास भोजनाने या योजनाबद्ध शपथविधी समारंभाची सांगता झाली.






