खरपुडी येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रम
खरपुडी:
डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी, पुणे यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम १६ जून २०२६ (गुरूवार) रोजी सायंकाळी ५.०० वाजता साई मंदिर मांडवळे येथे आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत व पर्यावरणपूरक शेती पद्धतींची माहिती मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात गुलाब पाणी व्यवसाय व गट शेती या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
गुलाब पाणी व्यवसाय मध्ये तयार करण्याची प्रक्रिया, आवश्यक कच्चा माल व साधने, पॅकेजिंग व ब्रॅंडींग आणि ऑनलाईन बाजार पेठ याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सहकारी शेती मध्ये गट शेतीचे फायदे व नियम, खर्च व नफा वाटप पद्धत याबाबत माहिती देण्यात आली.
तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रा. एस. एन. पाटील (समन्वयक)व प्रा. हर्षदा चिरमुरे (कृषी व्यवसाय तज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
या उपक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग असून ऐश्वर्या जगताप, साक्षी गायकवाड, मयुरी काळे, साक्षी सोनवणे, ऋतुजा शिवेकर, रचना ठाकरे आणि गायत्री अरगडे यांनी विशेष योगदान दिले आहे.
गावातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.






