*श्री गणेश तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ ते २६ साठी अध्यक्षपदी डाॅ. सौ. राधिका चव्हाण – हेरेकर यांची एकमताने निवड*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २६ साठी यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव साजरा होत आहे… मा. अहिल्यादेवी स्त्री सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या होत्या
या अनुषंगाने प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी डाॅ. सौ. राधिका चव्हाण – हेरेकर यांची निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्षपदी :- श्री. प्रशांत खर्डेकर , सिद्धेश जाधव कार्याध्यक्षपदी :- श्री.भूषण शिरसाट , खजिनदारपदी :- श्री. प्रणव लऊळकर व चिटणीसपदी श्री. प्रतिक माने , श्री. अवधूत कुलकर्णी यांची बहुमताने निवड करण्यात आली.
मंडळ यंदा १२३ व्या वर्षांत पदार्पण करत असून यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या साजरा होत आहे. श्री गणेश तरुण मंडळ त्यांना विनम्र अभिवादन करत आहे..तसेच प्रतिवर्षाप्रमाणे श्रींचा उत्सव हा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :-
सांस्कृतिक प्रमुख :- मुक्ता भावसार , वैष्णवी आंबेकर
मंडप प्रमुख :- ॐकार मेढी , आर्य मेढी
सजावट प्रमुख :- प्रतिक मेहता
धार्मिक प्रमुख :- श्री. केदार मेढी गुरुजी , श्री. प्रथमेश भालेराव , अक्षय कुलकर्णी
अहवाल :- शुभम फाकटकर
ढोल पथक प्रमुख :- यश झोडगे , साहिल गुप्ते , ईशान धर्माधिकारी
प्रसार व संपर्क प्रमुख :- रोहन मराठे , श्री. महेश सोनपावले
तरी सर्व गणेशभक्तांनी उत्सव काळात श्रींच्या दर्शनाचा, आयोजित कार्यक्रमांचा व प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा, हि नम्र विनंती.