पिंपरी-चिंचवडला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार; गांजा व अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईची मागणी!

SHARE NOW

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढत्या गांजा व अमली पदार्थांच्या सेवनामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असून समाजावरही त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहराला व्यसनमुक्त व सुरक्षित बनवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करत युवा नगरसेवक विश्वजित बारणे यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

यावेळी निवेदक चांद कासिम पटेल यांनी शहरातील विविध भागांमध्ये अमली पदार्थांची वाढती विक्री आणि सेवन याबाबत चिंता व्यक्त केली. युवकांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना – युवासेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते. यामध्ये युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचरणे, हृषिकेश मराळे  सहभागी झाले होते.

शहरातील युवकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि उज्ज्वल भवितव्य जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page