कृष्णराव भेगडे बी. फार्मसी महाविद्यालयामध्ये 2024 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्था संचालित, कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासु्टिकल एज्युकेशन अँड रिसर्च ( बी. फार्मसी ) महाविद्यालयामध्ये रिलायन्स फाऊंडेशन आणि मॅजिक बस यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13/12/2024 रोजी 2024 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव उत्साहात पार पडला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्याम आवटे यांनी केले. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रतिनिधी कविता प्रसाद यांनी त्यांच्या फाऊंडेशन तर्फे आपल्या 39 विद्यार्थ्यांचे आठ दिवस सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग घेऊन त्याच मुलांकरिता हा ड्राइव आयोजित केला होता. या निमित्ताने एजिओ फार्माचे मॅनेजर जगदीश खोत यांनी आपल्या 21 विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपनी मध्ये इंटर्नशिप करीता निवड केली. तसेच मेडप्लस कंपनीच्या मनीषा सोंडगे यांनी आपल्या 3 विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट या पदावर निवड केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे सर यांनी भविष्यात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना व त्या प्रत्यक्षात साकरण्यासाठी करत असलेले प्रयत्न याचीही माहिती दिली.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जगदीश खोत यांनी कंपनीच्या नियमांची माहिती दिली. आभार प्रदर्शन व अल्पपोहार देऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा, विश्वस्त सौ. निरुपा कानिटकर यांनी शुभेच्छा दिल्या.