*ॲड पु. वा.परांजपे विद्या मंदिरामध्ये ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न*
तळेगाव दाभाडे :
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसमोर आपल्या कार्याचे आदर्श ठेवावेत. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक तसेच श्री एकविरा विद्या मंदिर कारला या शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री सोनबा गोपाळे गुरुजी यांनी व्यक्त केले.यावेळी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे विद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार भेगडे संजय बाविस्कर श्रीकांत दाभाडे, बहुसंख्येने माजी विद्यार्थी,पालक आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोनबा गोपाळे गुरुजी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीत ,ध्वजगीत, राज्यगीत,प्रतिज्ञा व प्रार्थना यानंतर घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर दुमदुमला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले.यावेळी शासन परिपत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूह गीत गायन,समूहनृत्य,भाषण,चित्रकला व हस्तकला दालन यांसारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी तुषार भेगडे, संजय बाविस्कर, श्रीकांत दाभाडे यांनी आपली मनोगत व्यक्त करून विद्यालयाच्या होत असलेल्या सर्वांगीण प्रगती विषयी आनंद व्यक्त केला. तसेच भविष्यामध्ये शाळेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनबा गोपाळे पुढे बोलताना म्हणाले परांजपे विद्यामंदिर या शाळेचा वेगवान भौतिक व गुणवत्ता संपन्नपूर्ण विकास कौतुकास्पद आहे. उत्कृष्ट नियोजन, सुव्यवस्थित कार्यवाही याचा परिपाक नेहमी यशात होतो. पुणे जिल्ह्यातील भौतिक सुविधांनी सुसज्ज, गुणवत्तापूर्ण विद्यालय म्हणून परांजपे विद्यालय नावारूपास येत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे जिल्ह्यातील हे पहिले डिजिटल स्मार्ट स्कूल आहे. विद्यालयाच्या प्रत्येक घटकाचा या यशामध्ये मोलाचा सहभाग आहे.विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी उपस्थित यांचे आभार मानले प्रभा काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.