नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडे :
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे सकाळी ठीक साडेसात वाजता नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपक्रमशील सचिव माननीय संतोषजी खांडगे साहेब यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेची पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट गाईड चे विद्यार्थी यांनी मान्यवरांना मान वंदना देऊन उत्तम असे संचलन केले. यावेळी शासन परिपत्रक प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूह गीत गायन समूह गीत.नृत्य भाषण घरघर संविधान अंतर्गत विद्यार्थी शिक्षक पालक यांनी सेल्फी काढली व प्रभात फेरी यासारखे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी या सर्व उपक्रमाला अनुराधा हुलावळे, मिरा शेलार, युवराज रोंगटे, बळीराम माळी, बापूसाहेब पवार, वृषाली जगताप, ऐश्वर्या शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले या कार्यक्रमास मार्गदर्शन शालेय समितीचे अध्यक्ष मा श्री महेश भाई शहा शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे पर्यवेक्षक शरद जांभळे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संतोष खांडगे यांनी आपल्या भारत देशाचे जागतिक पातळीवरती असणारे स्थान व्यक्त करत असताना आजचा विद्यार्थी व शिक्षक कसा असावा तसेच राष्ट्रीय शिक्षण देणारी नवीन समर्थ विद्यालय या शाळेचे कार्य किती महान आहे हे सांगत असताना देश अभिमान असण्यासाठी देशाचे प्रतीक तिरंगा ध्वजाचे कापडी स्टिकर लावून 26 जानेवारी व 15 ऑगस्ट हे राष्ट्रीय सण साजरे करण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून देशाने केलेला विकास व आज आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असा असावा यावर मार्गदर्शन केले
या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक श्री भगवान शिंदे रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी चे सचिव माजी विद्यार्थी
श्री शंकर भेगडे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तळेगाव शहराचे प्रमुख व माजी विद्यार्थी तसेच कृषी अधिकारी तुकाराम सावंत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर शालिग्राम भंडारी. अनेक शाळेचे माजी विद्यार्थी पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विषयाच्या शिक्षिका कुमारी शिल्पा पवार यांनी आपल्या सूत्रसंचालनाच्या द्वारे केले आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वासंती काळोखे यांनी केले