पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने संकल्प नशामुक्ती अभियानाचे संपन्न..
लोणावळा :पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्य साई कार्तिक यांच्या संकल्पनेतून पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या संकल्प नशा मुक्त अभियानांतर्गत दिनांक 16 एप्रिल रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट कुसगाव बुद्रुक लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे या संस्थेतील एकूण आठ विविध विभागाचे कॉलेजमधील प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक, कॉर्डिनेटर, एनएसएस,एनसीसी व इतर सर्व विद्यार्थी यांच्यासाठी संकल्प नशा मुक्ती अभियानाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग, लोणावळा यांनी कार्यशाळा घेऊन सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले नशेबाबत विद्यार्थी व कॉलेज प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
1)कॉलेजमधील जे विद्यार्थी दारू गांजा चरस एमडी पावडर अशा विविध प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेले आहेत त्यांची माहिती संकलित करणे.
2) कॉलेजमध्ये अशा प्रकारची कोणी नशा करत असल्यास अथवा अशी अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती असल्यास त्याबाबत आम्हाला वैयक्तिक माहिती कळविण्याबाबत आवाहन केलेले आहे.
3) कॉलेजमध्ये समुपदेशन कक्ष स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे प्राचार्य शिक्षक होस्टेलच्या रेक्टर पोलीस असे प्रतिनिधी यांची नेमणूक करणे.
4) नशा करणारे विद्यार्थी यांना संकल्प नशा मुक्ती अभियानांतर्गत अशा समुपदेशन कक्षामध्ये आणून त्यांचे त्या ठिकाणी समुपदेशन करणे नशा करणारे विद्यार्थी यांच्या पालकांना बोलावून त्यांना मार्गदर्शन करणे.
5) कॉलेजचे मुख्य प्रवेशद्वार, हॉस्टेलचे प्रवेशद्वार व एक्झिट गेटवर तपासणी करणे.
6) कॉलेज प्रशासनाचे माध्यमातून विद्यार्थी वास्तव्याच्या ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन अशा दारू गांजा चरस एमडी इत्यादी प्रकारचे नशा कोण करते आहे का याची चेकिंग केली जाईल.
7) कॉलेज लागत असलेली पोलीस चौकी सक्रिय करून त्या ठिकाणचे पोलीस स्टाफच्या मदतीने कॉलेज कॅम्पस व हॉस्टेल परिसरात पेट्रोलिंग करण्यात येईल. कॉलेजमधील विद्यार्थी यांच्यावर कॉलेज प्रशासन व पोलीस प्रशासनाचे मार्फत विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
8) कॉलेजमधील विद्यार्थी यांना नशा पुरविणारे डीलर यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
वरील प्रमाणे विविध विषयांवर मार्गदर्शन करून कॉलेजमध्ये तरुण मुले मुलांमध्ये वाढत चाललेली विविध प्रकारचे नशा रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने संकल्प नशा मुक्ती अभियान सुरू केलेल्या आहे. आतापर्यंत या अभियाना मार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत.