निलया सोसायटीमध्ये श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
तळेगाव दाभाडे :
निलया सोसायटीमध्ये श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दुपारी ठीक बारा वाजता नीलया सोसायटिमधील सर्व महिलानी मिळुन श्री रामांचा पाळणा व जन्मोत्सव साजरा केला. सोसायटीतील सर्व महिला मंडळी,ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.निलया सोसायटितील लहान मुलांनी व महिलांनी आप आपल्या परिने श्री रामजन्मोत्सव साजरा करण्या साठि योगदान दिले.
निलया सोसायटितील आयोजकांनी सायंकाळी भजन व संगीत आदीचे आयोजन केले होते. श्रीराम नवमी निमित्त वाकड येथील संत श्री शिरोमणी महाराज भजनी मंडळ व सहकारी यांनी विविध भजन व संगीत सादर करून उपस्थित राम भक्तांना मंत्रमुग्ध करून राम प्रभूंचे स्मरण केले. संत शिरोमणी महाराज भजनी मंडळाचे संचालक श्री राजाभाऊ भुजबळ यांचा सत्कार सोसायटीच्या वरिष्ठ नागरिकांकडून श्रीफळ व गुलाब पुष्प देवुन करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निलया सोसायटीतील सर्व सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले.