# राज शिष्टाचाराचे पालन न करणाऱ्या वर कारवाई करा#
तळेगाव दाभाडे: सर न्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वागताला कोणीही सनदी अधिकारी गेले नाहीत. यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान या प्रकरणातील दोषी सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी तळेगाव दाभाडे येथील फुले -शाहू – आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक .माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभुळकर. प्रतिष्ठानचे सचिव जयंत कदम.माजी नगरसेवक अरुण बबनराव माने. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सेल चे पुणे जिल्हाध्यक्ष सुहास बळीराम गरुड. यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यावेळी त्यांच्या स्वागताला एकही सनदी अधिकारी. पोलीस महासंचालक. मुख्य सचिव. पोलीस आयुक्त हे विमानतळावर आले नाहीत. राज शिष्टाचारानुसार या सर्वांनी भूषण गवई यांच्या स्वागतासाठी येणे अपेक्षित होते. भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर चैत्यभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व मुख्य सचिव सुजाता सौनिक या उपस्थित झाल्या.पण. या दौऱ्याकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य शासनाने योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.