पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह १२ जणांना चार चाकी गाडीने उडवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांची केली विचारपूस#
पुणे:
पुणे शहरातील भावे हायस्कूल समोरील रस्त्यावर मद्यधुंद चार चाकी गाडीच्या चालकाने १२ जणांना उडविल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. मद्यधुंद गाडी चालक जयराम शिवाजी मुळे(वय२७रा. बीबवेवाडी पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे. विश्रांत बाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार भावे हायस्कूल परिसरात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका मोठ्या प्रमाणात आहेत. भावे हायस्कूल समोरील रोडवर एक चहाची टपरी आहे त्या ठिकाणी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि अन्य नागरिक चहा पीत होते. त्यावेळी एमएच १३ ई पी ०३५४ या क्रमांकाच्या चार चाकी गाडीने तब्बल १२ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत ६ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि अन्य ६ जण असे एकूण १२ जण जखमी झाले आहे. या घटनेतील जखमींना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी जयराम मुळे याला पोलिसांनी अटक केली असून. आरोपी चालकाने गाडी मद्यधुंद अवस्थेत चालवल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. आरोपी जयराम मुळे याची ही गाडी नसून त्याच्या मित्राची हि गाडी आहे. पोलिसांनी गाडी मालकास देखील चौकशी करिता बोलविले आहे. आरोपीचे पोलीस कसून चौकशी करत आहेत.