तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : जनतेच्या सुख-दुःखाशी नाळ जोडून लोककल्याणाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य काळाच्या ओघात अधिक तेजस्वी होत आहे. त्यांच्या कर्तृत्वातून समाजसेवा, न्यायनिष्ठा आणि विकासाचा संदेश मिळतो. हा प्रेरणादायी वारसा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांनी व्यक्त केले.

 

तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ अभिवादन केले. कार्यक्रमात उपस्थितांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला स्मरण करून आदर व्यक्त केला.

 

अहिल्यादेवींनी राज्यकारभारात लोकहिताला सर्वोच्च स्थान दिले. धार्मिक स्थळांचे जतन, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही अनुकरणीय असल्याचे दाभाडे (पाटील) यांनी नमूद केले. त्यांच्या विचारांमधून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

 

प्रास्ताविकात निर्मला पोटे यांनी अहिल्यादेवींच्या शौर्यपूर्ण जीवनकार्याचा, कुशल प्रशासनाचा आणि समाजोन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा आढावा घेतला. न्यायप्रिय, दूरदृष्टी असलेल्या आणि लोकाभिमुख राज्यकर्त्या म्हणून त्यांचे स्थान इतिहासात अढळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पोटे, गौरव गुंड, सतीश पिंगळे, शेखर गुंड, अशोक गुंड, प्रकाश ठोंबरे, बाळासाहेब पाचरणे, जयवंत शेळके, अरुण ढालपे, तुकाराम भोजने, विशाल चेंडगे, युवराज पोटे, सुनील कापडी, नाना गुंड, नवनाथ बेडगे, दीपक बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक सुरेश लबडे यांनी केले, तर शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page