सांगवीतील PWD मैदानात दारू व अमली पदार्थांचे अड्डे; महिलांमध्ये भीतीचे वातावरण – पैलवान सुमित भोसले यांची प्रशासनाकडे जोरदार मागणी

SHARE NOW

सांगवी, पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:

सांगवी येथील खेळांसाठी राखीव असलेल्या PWD मैदानात रोज सायंकाळी दारू व अमली पदार्थांचे सेवन सुरू असून, त्यामुळे परिसरात असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पुणे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पैलवान सुमित अरविंद भोसले यांनी केली आहे.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, बॅडमिंटन हॉल समोरच्या मोकळ्या जागेमध्ये तसेच साई चौकाच्या मागील बाजूस दररोज रात्री नशा करणाऱ्या लोकांचा जमाव असतो. महिलांना या मार्गावरून चालताना भीती वाटते आणि त्यांना पाण्याच्या टाकीच्या मागच्या रस्त्याने वळसा घालावा लागतो.

“हा परिसर खेळाडूंना आदर्श देण्याऐवजी गुन्हेगारी प्रवृत्तीचे चित्र दाखवतोय. अशा वातावरणात कोणता पालक आपल्या मुलांना मैदानात पाठवेल?” असा सवाल सुमित भोसले यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

त्यांनी सांगितले की इंद्रप्रस्थ अपार्टमेंटजवळील दारू दुकानासमोरसुद्धा रोज मोठ्या प्रमाणात मद्यपान होतं. या प्रकारांमुळे जुनी सांगवी ते नवी सांगवी दरम्यान महिलांच्या हालचालींवर मर्यादा येत आहेत आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांची मागणी:

1. सांगवी पोलीस स्टेशनने गस्त वाढवावी व अड्ड्यांवर कारवाई करावी

2. महापालिका व पाटबंधारे विभागाने रात्री मैदानात विजेची व्यवस्था करावी

3. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी

4. PWD ग्राउंड परिसरात खेळाडूंसाठी सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करावे

 

 

 

 

—“छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगवी गावात अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना थारा देता कामा नये” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

*भय मुक्त सांगवी | गुन्हेगारी मुक्त सांगवी*

—संपर्कासाठी:

*पैलवान सुमित अरविंद भोसले*

आंतरराष्ट्रीय खेळाडू| अध्यक्ष – पुणे कुस्ती महासंघ

मो. 7249853536


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page