आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांची व्यापक तयारी.शांतता समिती बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा निर्धार.

SHARE NOW

लातूर :

दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी लातूर पोलीस यांच्या वतीने आगामी विविध धर्मीय सण-उत्सव शांततेत, उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडावेत यासाठी शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठक पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथील मीटिंग हॉलमध्ये पार पडली.

या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी तसेच सर्व जाती-धर्मातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, समाजसेवक, विविध मंडळे व समित्यांचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री,जय सेवालाल जयंती, रमजान महिना व रमजान ईद, होळी, धुलीवंदन, रंगपंचमी तसेच इतर साजरे होणारे सर्वधर्मीय सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. संवेदनशील भागांचे विश्लेषण, मिरवणुकांचे मार्ग, धार्मिक स्थळांची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, सोशल मीडिया देखरेख व अतिरिक्त बंदोबस्त यासंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच उपस्थित सर्व शांतता समिती सदस्य व इतर मान्यवर यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत आश्वस्त करण्यात आले.

 

पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी बैठकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शांतता समिती सदस्य व इतर मान्यवरांना संबोधित करून लातूर शहर हे सुसंस्कृत, सर्वधर्मसमभाव जपणारे शहर असून महाराष्ट्रामध्ये लातूर शहराची वेगळी सुसंस्कृतपणाची ओळख आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या लातूर जिल्ह्याच्या प्रगती व उन्नतीसाठी तसेच लातूरचा सुसंस्कृतपणा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनास योग्य असे सहकार्य करून लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी होऊन शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सजगपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

Advertisement

 

*पोलीसांकडून करण्यात आलेल्या प्रमुख उपाययोजना.*

 

👉🏻संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त.

👉🏻जीप पेट्रोलिंग व पायी गस्त वाढविणे.

👉🏻“गुड मॉर्निंग स्कॉड” सतर्क ठेवणे.

👉🏻एसआरपीएफ प्लाटून, ९६० पुरुष होमगार्ड व १५० महिला होमगार्ड यांची नेमणूक.

👉🏻प्रमुख मशिदी, ईदगाह व कब्रस्तान परिसरात बंदोबस्त.

👉🏻वाहतूक नियोजन व पर्यायी मार्गांची आखणी.

👉🏻अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई

👉🏻सोशल मीडिया विशेष मॉनिटरिंग सेल कार्यरत.

👉🏻अवैध मद्यविक्री व इतर गैरप्रकारांवर विशेष मोहिम.

👉🏻नाकाबंदी व रात्रीची गस्त वाढविण्यात येणार.

👉🏻महिला सुरक्षा पथक सक्रिय करण्यात आले आहेत.

👉🏻महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) अंतर्गत आवश्यकतेनुसार अधिसूचना.

👉🏻महत्वाच्या पुतळे, मंदिरे, मशिदी व धार्मिक स्थळांवर विशेष बंदोबस्त.

👉🏻डीजे व ध्वनीप्रदूषणासंदर्भात वेळ व ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन.

 

शांतता समितीच्या बैठकीत सर्व धर्मीय प्रतिनिधींनी सण-उत्सव शांततेत व बंधुभावाने पार पाडण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. कोणत्याही अफवा, भडकावू संदेश किंवा समाजविघातक प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही, असे एकमताने नमूद करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी अध्यक्षीय भाषणात नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच लातूर पोलीस दल हे सर्व सण-उत्सव कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून यशस्वीरित्या पार पाडण्यास पूर्णतः सक्षम असल्याचा विश्वास व्यक्त केला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page