८१ व्या वाढदिवसानिमित्त श्री. क्षेत्र भंडारा डोंगरावरील श्री. क्षेत्र विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांस स्टील चे १६ टेबल खुर्ची भेट
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील आदर्श माता श्रीमती. सुलोचना दत्तात्रय खांडगे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त श्री. विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा ट्रस्ट या संस्थेस १६ स्टील चे टेबल व खुर्ची भेट स्वरूपात खांडगे परिवारातर्फे नुकतेच देण्यात आले. श्री.संतोष दत्तात्रय खांडगे, श्री. स्वानंद दत्तात्रय खांडगे, शिल्पा संदीप शिंदे, यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना दत्तात्रय खांडगे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त घरगुती स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी श्री. क्षेत्र भंडारा डोंगरावरील श्री. क्षेत्र विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब काशीद, विश्वस्त श्री. जगन्नाथ नाटक पाटील,श्री . जोपाशेट पवार, श्री.विठ्ठल काळोखे, श्री. रावसाहेब दिवेकर, ह.भ.प. अशोक महाराज मोरे, ह.भ.प. उत्तम महाराज पाटील तसेच खांडगे परिवारातील श्री.संतोष दत्तात्रय खांडगे, सौ. रजनीगंधा संतोष खांडगे, श्री. स्वानंद दत्तात्रय खांडगे, शिल्पा संदीप शिंदे,श्री. संदीप मनोहर शिंदे,डॉ. अक्षता संदीप शिंदे आदी मंडळी उपस्थित होते.
श्री. बाळासाहेब काशीद आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मावळभूषण मामासाहेब खांडगे परिवाराने नेहमी दातृत्वाची भूमिका पार पडली आहे. श्री.क्षेत्र भंडारा डोंगरावर नेहमी वारकरी मंडळी मोठ्या संख्येने येत असतात या वारकरी मंडळीमध्ये वयोवृद्ध वारकरी मोठ्या प्रमाणात असतात त्यांना खाली बसून अन्नप्रसाद घेता येत नाही. त्यामुळे त्या वारकरी मंडळींना अडचण निर्माण होते. श्री. संतोष खांडगे व श्री. स्वानंद खांडगे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त १६ स्टिल चे टेबल खुर्ची भेट स्वरूपात दिल्यामुळे १६० वयोवृद्ध वारकरी एका वेळास टेबल खुर्च्यांवर बसून अन्न प्रसाद घेऊ शकतील. जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्यामध्ये ६ लाख १० हजार किंमतीचे १६ स्टील टेबल खुर्च्या भेट स्वरूपात आल्या ही निश्चित कौतुकास्पद बाब आहे.
श्री. संतोष खांडगे म्हणाले, मला मातोश्रींच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट यांचे ऋण व्यक्त करतो.
श्रीमती सुलोचना दत्तात्रय खांडगे यांचा श्री. क्षेत्र डोंगर ट्रस्ट तर्फे अध्यक्ष श्री. बाळासाहेब काशीद यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.