*गुरुवारी तळेगाव दाभाडे येथे सामुदायिक अग्निहोत्र चे आयोजन!*
तळेगाव दाभाडे :
दिनांक १६ मे २०२४ रोजी तळेगाव दाभाडे कातवी येथील अग्निहोत्र मंदिरामध्ये परमसद्गुरु श्रीगजाननमहाराज यांच्या जन्मोत्सवा ( १६ मे) निमित्त सायंकाळी ६.३० ते ७.१५ ) १०८ सामुदायिक भव्य अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज द्वारा स्थापित दिव्य गुरु पिठावरील परमसद्गुरु श्रीगजाननमहाराज (शिवपुरी – अक्कलकोट) यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने आयोजित केलेल्या अग्निहोत्राचे आपण सर्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा. सुख,शांती समृद्धी प्राप्तीसाठी आपल्या घरी हे अग्निहोत्र सुरू करावे
असे आवाहन मा.नगरसेवक कातवी श्रीधर चव्हाण आणि अग्निहोत्र प्रचारक गजानन निकाळे यांनी केलेले आहे.