*रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा पदग्रहण समारंभ संपन्न*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथे रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष मिलिंद शेलार आणि सचिव राजेंद्र पंडीत यांचे पदग्रहण करण्यात आले.सध्या क्लबने दहा हजार झाडांचे वृक्षारोपण, छत्रछाया प्रकल्पांतर्गत गरजूंना केलेले छत्री वाटप, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिनानिमित्त १००० कापडी पिशव्यांचे वाटप, डॉक्टर डे निमित्त रक्तदान शिबिराचे आदींचे यशस्वी आयोजन केल्यामुळे अध्यक्ष मिलिंद शेलार आणि टीम यंदाच्या वर्षी लक्षणीय काम करेल असा विश्वास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नितीन ढमाले यांनी व्यक्त केला.यावेळी तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात पदग्रहण समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सरस्वती पूजन केल्यानंतर स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीताने स्वागत केले.यावेळी पदग्रहण समारंभामध्ये माजी अध्यक्ष राहुल खळदे यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर नूतन अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी सर्वांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये ग्रामीण भागातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून रोटरीच्या समाज उपयोगी कार्य करत जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. पदग्रहण संपन्न होतात रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने इंटरनॅशनल क्लबला १५०० डॉलर देत असल्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी जाहीर केले सांगण्यात आले.

Advertisement

कै.ॲड.कु.शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दहा हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असल्यामुळे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी कौतुक केले. यावेळी माजी तहसीलदार रामभाऊ माने यांना रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने व्होकेशनल एक्सलन्स रोटरी अवॉर्ड देण्यात आला.माने यांच्या मानपत्राचे वाचन माजी अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी केले.यावेळी रोटरीच्या सर्व मेंबरचे पिनअप करण्यात आले.यावेळी उपप्रांतपाल आनंद असवले तसेच सर्व संचालक आणि सदस्य उपस्थित होते.सूत्रसंचालन लक्ष्मण मखर आणि दिलीप कांबळे यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page