लायन्स पॉईन्ट येथे हुक्का व हुक्का पिण्याचे साहित्यासह हुक्का पिणाऱ्या तळोजा येथील इसमावर गुन्हा दाखल

SHARE NOW

लोणावळा :

लोणावळा,मा जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पुणे जिल्हातील पर्यटन स्थळावरील मावळ तालुक्यातील प्रामुख्याचे ठिकाणी पावसाळयातील पर्यटनासाठी येणारे नागरीकांचे सुरक्षिततेचे दृष्टीने व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता ता २/७/२०२४ ते दिनांक ३१/७/२०२४ रोजी पर्यन्त भुशी डॅम धरणे व गड किल्ले परिसर टायगरपॉईन्ट,लायंन्स पॉईन्ट,पवना धरण घुबड तलाव व इतर ठिकाणी सायकांळी ६ ते सकाळी ६ वाजताचे दरम्यान सदर ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आले बाबतचे आदेश पारीत केलेले आहेत. तसेच मा. श्री. पंकज देशमुख सोो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण तसेच मा. सत्यसाई कार्तीक सोो, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग यांनी पोलीस ठाणे हद्दीत पर्यटनासाठी येणारे पर्यटकांचे सुरक्षिततेसाठी मा. जिल्हाधिकारी सोो पुणे यांनी काढलेल्या आदेशाची काटेकोर पणे पालन करणेबाबत व नियमांचे उल्लंघन करणारे इसमांवर कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने आम्ही लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होवु नये यासाठी सर्व पर्यटन स्थळांवर पोलीस बंदोस्त तैनात केलेला असताना देखील पोलीसांची नजर चुकवून इसम नामे आमार शब्बीर पटेल वय ३० वर्षे रा. घर नं. १३५, बाग मोहल्ला, तळोजा पाचनंद, तळोजा मस्जिद जवळ, तळोजा जि. रायगड हा दिनांक १५/०७/२०२४ रोजी सांयकाळी १८:०० वाजण्याचे सुमारास मौजे आतवण गावचे हद्दीतील लायन्स पॉईन्ट, ता मावळ, जि. पुणे येथे. सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिक रित्या मानवी जिवीतास धोका व शासनाने बंदी घातलेले हुक्का व हुक्का पिण्याचे साहित्यासह हुक्का पित असताना मिळुन आलेला असून त्याने मा. जिल्हाधिकारी सो, पुणे यांनी पारित केलेल्या आदेशाचे उल्लघंन करून सार्वजनीक ठिकाणी मानवी जिवीतास धोका व शासनाने बंदी घातलेले हुक्का व हुक्का पिण्याचे साहित्यासह हुक्का पित असताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादने,जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणीज्य व उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय, अधिनियम २००३ चे सुधारीत अधिनियम २०१८ चे कलम ४(अ) व २१ (अ) व भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी सो, पुणे याचे आदेशाचे उल्लघंन करणारे एकुण ०८ इसमावर आतापर्यंत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कडून वेगवेगळे

Advertisement

 

०३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तरी लोणावळा व परिसरात सततधार पडत असल्या पावसामुळे नदी, नाले, धबधबे इ. ठिकाणी मोठ्याप्रमाणवर पाणी वाहत असून पर्यटंकानी पाण्याचा अंदाज नसताना धरण क्षेत्र व धबधब्याचे पाण्यात प्रवेश करू नये, नशापान करू नये तसचे मा. जिल्हाधिकारी सोो, पुणे, मा. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व मा. श्री. सत्यसाई कार्तीक सोो, सहा. पोलीस अधीक्षक, लोणावळा विभाग यांनी दिलेल्या आदेशाचे व सुचनांचे पालन करून प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच पर्यटनाचा आनंद घेणेबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच मा. मा. जिल्हाधिकारी सो, पुणे याचे आदंशाचे उल्लंघन करणारे इसमांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page