नूतन अभियांत्रिकीमध्ये सहज योग ध्यान कार्यशाळेचे आयोजन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

नूतन अभियांत्रिकीमध्ये सहज योग ध्यान कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश आंतरिक आरोग्य सुधारणे, मानसिक विश्रांती, भावनिक संतुलन आणि सर्वांगीण कल्याण साधणे हा होता. सर्व कर्मचाऱ्यांनी या अंतरबाह्य समृद्ध करणाऱ्या सत्रात सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला.या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकीचे संचालक डॉ. प्रमोद पाटील आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शंकरराव उगले व मान्यवरांचा सत्कार प्रबंधक विजय शिर्के यांनी केले. सैद्धांतिक सत्र स्वीटी हांडे यांनी घेतले. आत्मसाक्षात्कार ही क्लिष्ट कल्पना प्रात्यक्षिक सञाद्वारे मनीषा देवडा यांनी समजावली ,तर घरगुती सराव आणि मानसिक संतुलन साधण्याच्या पद्धती निवृत्त कर्नल यशवंत माने यांनी सोप्या करुन सांगितल्या. प्रश्नोत्तरांचे सत्र डॉ. अविनाश सांगोलेकर आणि अरुण कुमार सरकार यांनी घेतले.

कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रशांत अहिरे यांनी मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page