खेड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शांताराम कडूसकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड

SHARE NOW

खेड, प्रतिनिधी :

खेड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी श्री. शांताराम जिजाबा कडूसकर यांची कोरेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील शेतकरी, सभासद आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री. कडूसकर हे देहू येथील सुप्रसिद्ध पाटील व प्रगतशील शेतकरी कै. कोंडीबा अण्णा कंद पाटील यांचे ज्येष्ठ जावई आहेत. तसेच संत तुकाराम अन्नदान मंडळाचे संस्थापक लक्ष्मण कंद आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी सरपंच मधुकर कंद पाटील यांचे ते दाजी आहेत. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कडूसकर यांचे ते वडील होत.

शेती, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे श्री. कडूसकर यांच्या निवडीचे देहू व पंचक्रोशीतील नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेतकरी बांधवांनी स्वागत केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या हिताचे विविध विकासात्मक उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निवडीनंतर सभासद, सहकारी आणि मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. कडूसकर यांनी सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत सोसायटीच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

लोकप्रिय आमदार बाबाजी काळे यांनी अभिनंदन करताना सांगितले की, “कडूसकर कुटुंब वारकरी संप्रदायाशी निगडित असून आदर्श शेतकरी आणि समाजाभिमुख कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे. शांताराम कडूसकर यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना ही जबाबदारी मिळाली असून ते या संधीचे निश्चितच सोने करतील.” श्री. शांताराम कडूसकर यांच्या निवडीमुळे कोरेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पुणे जिह्वा काँग्रेस अध्यक्ष कमलाकर सातव यांनी व्यक्त केला आहे.

पुणे-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. गोरक्षनाथ काळे यांनी निवडीचे स्वागत करताना सांगितले की, “कडूसकर दाजी हे मूळचे काँग्रेस विचारसरणीचे असले तरी त्यांनी राजकारणापेक्षा शेतीला प्राधान्य देत आदर्श शेतीच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.”

Advertisement

ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी सरपंच मधुकर कंद पाटील म्हणाले, “कडूसकर दाजी हे मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि हाडाचे शेतकरी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचे कामकाज प्रभावीपणे पार पडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल.”

देहू विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन अभिमन्यू काळोखे यांनीही निवडीचे स्वागत करत देहू परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व टाटा मोटर्स युनियनचे उपाध्यक्ष प्रकाश हगवणे म्हणाले, “सुनील कडूसकर यांच्यामुळे कोरेगाव येथे जाण्याचा नेहमी योग यायचा. शांताराम कडूसकर यांच्याशी सातत्याने संवाद होत असे. त्यांच्या या सार्थ निवडीचा आम्हाला अभिमान वाटतो.”

 

देहू काँग्रेसचे माजी अध्यक्ष रशीद धोंडफोडे म्हणाले, “शांताराम कडूसकर यांचा सहवास, प्रेमळ स्वभाव आणि कार्यपद्धती आम्ही जवळून अनुभवली आहे. आदर्श शेतकरी, आदर्श पिता आणि आदर्श कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे.” ऑर्डनन्स फॅक्टरीचे पाच वेळा कामगार अध्यक्ष म्हणून विक्रम नोंदवणारे राजेंद्र हगवणे यांनीही निवडीचे स्वागत केले. “लहानपणापासून आम्ही कडूसकर मामांना भेटायला जात असू. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने आम्ही नेहमीच भारावून जायचो,” असे त्यांनी सांगितले.

मावळ काँग्रेसच्या समन्व्यक माजी अध्यक्षा वनिताताई देशकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “कडूसकर हे माझे मामा आहेत. लहानपणापासून कोरेगाव येथे मुक्कामी गेल्यावर त्यांनी आम्हाला संपूर्ण गाव, शेती, गुरेढोरे आणि परिसर फिरवून दाखवला. त्यांच्या निवडीमुळे आम्हाला मनस्वी आनंद झाला आहे.”

देहू काँग्रेसचे अध्यक्ष रणजित मोरे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश मुसूडगे, महिला काँग्रेस अध्यक्षा मायाताई सातपुते तसेच आई फाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेश चव्हाण यांनीही निवडीचे स्वागत केले आहे.

दरम्यान, देहू काँग्रेस पक्ष आणि आई फाऊंडेशनच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सौ. रंगुबाई कडूसकर व श्री. शांताराम जिजाबा कडूसकर यांचा यथोचित सत्कार आयोजित करण्यात आला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page