*नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद*..*सर्जेराव कांदळकर*
तळेगाव दाभाडे:
*नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था, सहाय्यक निबंधक कार्यालय वडगाव व मायमर मेडिकल कॉलेज जनरल हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने नुकताच तळेगाव दाभाडे येथे भव्य नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबीर आई तुळजा भवानी मंदिर टेल्को कॉलनी येथे संपन्न झाले असून वडगाव मावळचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी उपक्रमाचे कौतुक करताना नारायणराव काळोखे पतसंस्था गोरगरीब जनतेसाठी काम करते संस्थेच्या नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेताना एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन कांदळकर यांनी केले व संस्थेच्या कार्यपध्दतीचे कौतुक केले तर संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप, आरोग्य शिबीर, वारकऱ्यांसाठी मदत, आदिवासी विकास उपक्रम घेतले जातात असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांनी करताना संस्थेच्या कामकाजाचा आढावा विशद केला.अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करत असताना अनेक तरूणांची उद्योजक होण्याची स्वप्न संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत हातगाडीवाला ते मोठ्या उद्योगांना संस्था हातभार लावत आहे असे काळोखे यांनी सांगितले.*
*शिबिराचे उद्घाटन सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर,मायमर मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दर्पण महेशगौरी यांच्या हस्ते संपन्न झाले असून मान्यरांचा यथोचित सत्कार संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, उपाध्यक्ष सुर्यकांत काळोखे, सचिव विश्वनाथ काळोखे व संचालकांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे २५-२६ चे अध्यक्ष काळोखे पतसंस्थेचे सदस्य भगवान शिंदे यांनी केले तर सुत्रसंचलन संजय संदानशिव यांनी केले आभार उपाध्यक्ष सुर्यकांत काळोखे यांनी मानले.शिबिरामध्ये तळेगाव पंचक्रोशीतील २०० पेंशटची तपासणी झाली असून ३० रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निदान झाले तर ७० पेंशटला चष्मे वाटप करण्यात आले.फलके ऑप्टिकल संचलित निलेश फलके यांनी सवलतीच्या दरात चष्मे देऊन उपक्रमास विशेष सहकार्य केले.*
*सदर प्रसंगी सहाय्यक निबंधक संस्थेचे राकेश निखारे, डॉ.अमोल वाळके,रोटरी सिटीचे माजी अध्यक्ष सुरेश शेंडे, तुळजा भवानी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश घुले,माजी तहसीलदार रामभाऊ माने, मनोजकुमार जैन, उद्योजक बसाप्पा भंडारी, विश्वास कदम,राहुल पारगे, जगदिश जोशी, बाळासाहेब घुले, नानासाहेब कुटे,डॉ.सुशांत दुरकर, डॉ वैष्णवी काळे, डॉ स्नेहा सोनटक्के, डॉ दिव्या शिंदे, डॉ बालाजी शिंदे, डॉ कुणाल कोरडे इ.मान्यवर उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष सुर्यकांत काळोखे, सचिव विश्वनाथ काळोखे, ॲड शरद कदम, बाजीराव काळोखे , ॲड अमित काळोखे, चैतन्य कोरडे, रोहिणी नाटक, सुलोचना पडवळ,जयश्री काळोखे, रणजीत वीर, संजय जगताप,बाबा चौरे,कुणाल काळोखे, अमित काळोखेप, चंद्रकांत चव्हाण इ.सह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.*