पंचायत समिती वडगाव मावळच्या विस्तार अधिकारी शोभा वहिले यांचा द्वारकाधीश लाॕन्स येथे सेवापूर्तीनिमित्त सत्कारसमारंभाचे आयोजन

SHARE NOW

मावळ:

सोमवार दि.२८ एप्रिल रोजी पंचायत समिती वडगाव मावळच्या विस्तार अधिकारी शोभा वहिले यांचा द्वारकाधीश लाॕन्स येथे सेवापूर्तीनिमित्त सत्कारसमारंभ

पंचायत समिती मावळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती शोभा वहिले या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत , त्या निमित्ताने मावळ तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्यावतीने त्यांचा सत्कारसमारंभ सोमवार दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वा. द्वारकाधीश लाॕन्स , वडगाव मावव येथे आयोजित करण्यात आला आहे.

Advertisement

श्रीमती शोभा वहिले यांनी मावळ तालुक्यात ३९ वर्षे शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेले आहे.वडगाव , कान्हे , चौराईनगर सारख्या शाळामधील असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. पुणे जिल्ह्यातील पहिली फ्युचिरिस्टक शाळा कान्हे येथे त्यांच्याच प्रयात्नांनी नावारुपाला आली आहे.त्यांचे अनेक विद्यार्थी मोठमोठया पदांवर कार्यरत आहेत. काले काॕलनी बीटच्या विस्तार अधिकारी म्हणून पूर्ण काले काॕलनी बीट हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

त्याच बरोबर मावळ तालुका शिक्षक संघाच्या नेत्या म्हणून नेहमीच शिक्षक बंधू- भगिनीना अडीअडचणींत

मोलाचा आधार दिला आहे.पुणे जिल्हा शिक्षक संघाच्या महिला अध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा कारभार अत्यंत उत्तमरीत्या सुरु आहे.

अशा या महान व कर्तृत्वान व्यक्तीमत्वाचा सेवापूर्तीनिमित्त होत असलेल्या सत्कार समारंभास आपणही आवर्जून उपस्थित रहावे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page