*मावळ तालुक्यापासून युनिट नोंदणी व स्काऊटर गाईडर उजळणी वर्गास उत्साहात प्रारंभ*

SHARE NOW

मावळ :

पुणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षातील एक दिवसीय युनिट नोंदणी व स्काऊटर- गाईडर उजळणी वर्गांना आज पासून सुरुवात करण्यात आली. सदर उजळणी वर्ग दिनांक 15 जुलै ते 13 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले आहेत.

दिनांक 15/07/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कान्हे तालुका मावळ येथे पहिल्याच उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर उजळणी वर्गास तालुक्यातील जिल्हा परिषद, खाजगी इंग्लिश/ मराठी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेतील स्काऊटर गाईडर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गटशिक्षणाधिकारी मावळ तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट मा. श्री. सुदाम वाळुंज व विस्तार अधिकारी मा. वहिले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड प्रार्थनेने उजळणी वर्गा ची सुरुवात करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख मा. श्रीमती काळे मॅडम, श्रीमती क्षीरसागर मॅडम, श्रीमती कदम मॅडम, मुख्याध्यापक मा. श्री पारधी सर जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे , जिल्हा संघटक गाईड श्रीमती उषा हिवराळे , मा. श्रीमती अन्सारी मॅडम , केंद्रप्रमुख श्री पांडुरंग ढेंगळे, कांबळे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते

मान्यवरांनी उपस्थित स्काऊटर व गाईडर यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक स्काऊट श्री दिगंबर करंडे यांनी केले.

याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून जिल्हा संघटक स्काऊट श्री.दिगंबर करंडे, जिल्हा संघटक गाईड श्रीमती उषा हिवराळे, श्रीमती सुजाता तारळकर , श्रीमती शशी दगडे, श्री अनिल कळसकर, संपत चव्हाण , संदीप सपकाळ यांनी 91 शाळेतील उपस्थित शिक्षकांना कब,बुलबुल,स्काऊट,गाईड प्रवेश ते तृतीय सोपान अभ्यासक्रम, राज्यस्तरीय पुरस्कार, परीक्षा, उपक्रम, विद्यार्थी पथक नोंदणी, ऑनलाइन नोंदणी, स्काऊट गाईड शिक्षकांसाठी प्रशिक्षणे व पुरस्कार, स्काऊट गाईड प्रार्थना, झेंडा गीत, नियम, वचन, ध्येय, खून हस्तांदोलन, इत्यादी अभ्यासक्रमाची उजळणी घेण्यात आली. खरी कमाई, पंतप्रधान ढाल स्पर्धा, विविध समुदाय विकास प्रकल्प, सेवा कार्य व इतर सामाजिक उपक्रमात सहभाग, तालुका जिल्हा मिळावे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जांबोरी इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

मावळ तालुकास्तरीय स्काऊटर गाईडर उजळणी वर्गाचे उत्कृष्ट व यशस्वी आयोजन करण्यासाठी स्काऊट गाईडच्या तालुका समन्वयक तथा विषय तज्ञ पंचायत समिती मावळ श्रीमती अन्सारी मॅडम यांनी अथक परिश्रम घेतलेत त्याबद्दल त्यांचे स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले.

सदर उजळणी वर्गासाठी विद्यालयाचे स्काऊट गाईड शिक्षक व शिपाई विनोद उमाप यांनी मदत केली.

तालुका प्रतिनिधी श्री संदीप सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने उजळणी वर्गाची सांगता करण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page