पिंपळ खुंटे गावात कृषी कन्यांकडून झिरो एनर्जी कूल चेंबरचे प्रभावी प्रात्यक्षिक
पिंपळ खुंटे(ता. मावळ) :
पिंपळखुटे या गावात कृषी कन्यांनी ऊर्जाविना साठवणुकीसाठी उपयुक्त असलेल्या झिरो एनर्जी कूल चेंबर (ZECC) या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमाला गावातील शेतकरी, महिला बचत गट व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. प्रात्यक्षिकाचे आयोजन डॉ.डी.वाय.पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींकडून करण्यात आले. कृषी कन्यांनी या माध्यमातून शेतकऱ्यांना चेंबरचे बांधकाम, कार्यपद्धती, फायदे व वापराचे प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले.कृषीकन्या स्नेहा शिंदे, मानसी शिंदे, भाग्यश्री सुडके, वैष्णवी पवार, वर्षा गिरी, ज्योत्स्ना पावरा यांनी सांगितले, “ही यंत्रणा शेतकऱ्यांसाठी खर्चिक फ्रीज किंवा कोल्ड स्टोरेजचा स्वस्त व पर्यावरणपूरक पर्याय ठरतो”.झिरो एनर्जी कूल चेंबर म्हणजे वीज न वापरता थंड तापमान निर्माण करणारी साठवणूक यंत्रणा. विटा, वाळू, बांबू व पाणी यांच्या साहाय्याने तयार होणाऱ्या या चेंबरमध्ये वाळूतील बाष्पीभवनामुळे तापमान १०–१५ अंशांनी कमी होते, व त्यामुळे भाजीपाला, फळे आणि फुलं अधिक दिवस टिकतात.
प्रात्यक्षिकातील मुख्य मुद्दे चेंबर उभारणीची प्रत्यक्ष पद्धत, साहित्याचे प्रमाण व वापर,शेतकऱ्यांचे प्रश्नोत्तर सत्र,भाजीपाला साठवणुकीवरील परिणाम इ.होते. उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी कन्यांचे विशेष कौतुक केले.यावेळी गावचे शेतकरी तुकाराम गराडे, विठ्ठल गराडे, समीर गराडे इ.उपस्थितीत होते.या प्रात्यक्षिकासाठी डॉ. डी. वाय पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचे प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, उपप्राचार्य आणि समन्वयक डॉ. एस. एन. पाटील, व ए. बी. एस.प्रा एच . एस
चिरमुरे यांचे मार्गदर्शन लाभले.