मावळ भूमीचे सुपुत्र प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना उत्कृष्ट शिवव्याख्याते पुरस्कार जाहीर
गोविंद श्रीमंगल यांच्या जन्म सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त श्री. अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलन शिरूर जिल्हा लातूर आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी श्री. संत सेना महाराज मंदिर लातूर या ठिकाणी पार पडणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात मावळ भूमीचे शिव व्याख्याते, प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिव व्याख्याते हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक ०६ जुलै रोजी होणार असून श्री. अनंतपाळ ग्रामीण मराठी कवी संमेलन संस्थापक अध्यक्ष कवी गोविंद संभाजी श्रीमंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या कवी संमेलनाचे संमेलन अध्यक्षा कवयित्री पूजा माळी असणार आहेत.
कवी, प्रबोधनकार सागर भाऊ वाघमारे यांना पहिल्यापासूनच शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, सावित्री, रमाबाई, जिजामाता आणि इतर थोर समाजसुधारक यांचा लळा होता. त्यामुळे त्यांनी आपल्या तरुण वयात समाज प्रबोधनची वाट धरली व सामाजिक क्रांती घडवण्यास सुरुवात केली. सागर वाघमारे यांनी स्वतः नियोजन करून लेखक वर्गाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले. तसेच भव्य स्पर्धा भरवून विविध माध्यमातून समाजात व समाजातील लेखकांना उत्स्फूर्त करत आहेत. प्रबोधनकार सागर वाघमारे हे त्यांच्या विचारातून आणि अभ्यासातून ते समाजाच्या मुळापर्यंत पोहचले आहेत. आज त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






