*सुनिता महाजन ठरल्या भाग्यशाली महादुर्गा विजेता*

SHARE NOW

वडगाव (मावळ )

शारदीय नवरात्र उत्सवा दरम्यान सालाबादप्रमाणे याही वर्षी वडगाव नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने ” मी दुर्गा बेस्ट सेल्फी आणि रील्स कॉन्टेस्ट ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रीच्या नऊ रंगांच्या नऊ साड्या परिधान करून नऊ दिवस वेगवेगळे सेल्फी व रील्स पाठविणे अशा स्वरूपाच्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक 05 ऑक्टोबर 2025 रोजी पोटोबा महाराज प्रांगण परिसरात आयोजित करण्यात आला होता. तब्बल 135 महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गगन डान्स अकॅडमीच्या नृत्य कलाकारांनी गणेश वंदनेने या कार्यक्रमाचा श्री गणेशा केला. तर जागरारा गरबा ग्रूप पिंपरी यांच्या गरबा नृत्य आविष्कार सादरीकरणांनी या कार्यक्रमाची शोभा वाढविली. हजारो वडगावकर नागरिकांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला.

 

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली. त्याचप्रमाणे आयोजकांच्या निमंत्रणाचा मान ठेवून या सोहळ्यास अर्चनाताई शहा, सायलीताई बोत्रे, वैशालीताई दाभाडे, रूपालीताई दाभाडे, अंजनाताई मुथा, रेखाताई भेगडे, अर्चनाताई म्हाळसकर, पूजाताई वहिले, ज्योतीताई काटकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती होत्या.

Advertisement

 

या स्पर्धेत स्पर्धकांसाठी बक्षिसांची खैरात करण्यात आली. या स्पर्धेत नऊ दिवसाच्या नऊ दुर्गा त्याचप्रमाणे नऊ रिल्स व नऊ सेल्फी उत्तेजनार्थ, तीन रिल्स विजेते व लकी ड्रॉ पद्धतीने नऊ दुर्गांपैकी एक महादुर्गा म्हणून निवडण्यात आली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे, नऊ दिवसांच्या नऊ विजेत्या दुर्गा म्हणून १) प्रेमा जमदाडे, २) सुनिता महाजन, ३) आमिषा पाथरवट, ४) अंजली कांबळे, ५) कविता पाटील, ६) निकिता जाधव, ७) अनिता मोरे, ८) शिल्पा पवार, ९) रूपाली काकडे यांची निवड करण्यात आली. या नवदुर्गा विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू, सोन्याची नथ,पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र,चषक व मानाचा फेटा बांधून बक्षीस स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात आले. नऊ सेल्फी उत्तेजनार्थ म्हणून१) पुनम गायकवाड, २)वैशाली शिंदे, ३)नीलम कदम, ४) सारिका ओव्हाळ, ५)मनीषा निकम, ६)रूपाली जाधव, ७)पूजा शिंदे, ८)आरती खेंगले, ९)सलोनी मोतीबने तर रिल्स उत्तेजनार्थ म्हणून १)दिपाली पाटील, २)कोमल खरात, ३)सुनिता तरळकर, ४)अश्विनी कांबळे, ५)शुभांगी उदमले, ६)वनिता होळकर, ७)शिवानी कल्हाटकर, ८)रिंकू पट्टेबहादूर, ९)स्वाती पाटोळे यांची निवड करण्यात आली. या उत्तेजनार्थ विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू, सोन्याचे कर्णफुले, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमधून तीन स्पर्धकांना रिल्सच्या विजेतेपद देण्यात आले त्यांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे

प्रथम क्रमांक किरण ढेरे,

द्वितीय क्रमांक विशाखा लोंढे व तृतीय क्रमांक ममता दौंडे.

या विजयी स्पर्धकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू, वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी, पुष्पगुच्छ, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

वरील नऊ दुर्गा विजेत्यांमधून *सौ.सुनिता महाजन*

या महाभाग्यशाली महादुर्गा विजेता 2025 च्या विजेत्या ठरल्या.

पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेऊन विजय होण्याचा मान मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगणित झाला. त्यांना बक्षीस स्वरूपात फ्रिज, क्राऊन, चषक व पुष्पगुच्छ देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.

 

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सहा वर्षांपूर्वी मी दुर्गा बेस्ट सेल्फी आणि रिल्स कॉन्टेस्ट या स्पर्धेचे छोटेसे रोपटे प्रभाग क्रमांक 16 मध्ये रोवण्यात आले. आज या रोपट्याचे रूपांतर वडगाव शहरात वटवृक्षाप्रमाणे झाले. प्रत्येक वर्षी या स्पर्धेत महिलांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा मला आनंद आहे. यापुढे देखील वडगावकर महिलांसाठी व नागरिकांसाठी सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही या स्पर्धेच्या मुख्य आयोजिका सायली म्हाळसकर यांनी दिली.

 

महाराष्ट्रातील नावाजलेल्या उत्कृष्ट निवेदिका पूजाताई थिगळे यांच्या मधुर वाणीने हा संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला.

 

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन सुषमा म्हाळसकर, आरती म्हाळसकर, शितल म्हाळसकर, प्रतीक्षा शिंदे, प्रणाली म्हाळसकर, जागृती राणे यांनी पार पाडले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page