प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचा अपहरण करून खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
मावळ :
नवलाखउंब्रे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून करण्यात आला ही घटना गुरुवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
पंडित रामचंद्र जाधव (वय 48 राहणार जाधववाडी नवलाखउंबरे तालुका मावळ, पुणे ) असे खून झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की पंडित जाधव यांचे 14 नोव्हेंबर रोजी खंडणीसाठी अज्ञातांनी अपहरण केले होते. त्यानंतर आरोपींनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान आरोपींनी जाधव यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सुरज वानखेडे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून केला जात आहे. पंडित जाधव यांच्याकडे मॉगी नावाचा बैल आहे. त्याने अनेक शर्यतीत मैदान मारले आहे त्यामुळे जाधव यांचा पंचकृषित लौकिक होता.प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचा अपहरण करून खून
मावळ :
नवलाखउंब्रे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून करण्यात आला ही घटना गुरुवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
पंडित रामचंद्र जाधव (वय 48 राहणार जाधववाडी नवलाखउंबरे तालुका मावळ, पुणे ) असे खून झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की पंडित जाधव यांचे 14 नोव्हेंबर रोजी खंडणीसाठी अज्ञातांनी अपहरण केले होते. त्यानंतर आरोपींनी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान आरोपींनी जाधव यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सुरज वानखेडे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून केला जात आहे. पंडित जाधव यांच्याकडे मॉगी नावाचा बैल आहे. त्याने अनेक शर्यतीत मैदान मारले आहे त्यामुळे जाधव यांचा पंचकृषित लौकिक होता. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, संदीप डोईफोडे, गुन्हे-2 बाळासाहेब कोपनर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे -1 डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाणे, पोलीस हवालदार सुनील कानगुडे, प्रदीप पोटे,किरण काटकर, प्रदीप गोंडाबे, किशोर कांबळे, किरण जाधव, आशिष बोटके,चंद्रकांत जाधव व तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केले आहे. तपास अधिकारी रणजीत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.