*तळेगाव येथे दिवसा चोरी*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागात बुधवारी (दि.३१) दुपारचे सुमारास सेवाधाम हॉस्पिटल जवळ चोरी झाली आहे अशी फिर्याद स्वाती अरुण मोडक(वय ५८) सक्सेस चेंबर पहिला मजला प्लॉट नं.३ तळेगाव दाभाडे(स्टेशन )ता.मावळ यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे दिली आहे.सदर चोरी बुधवारी(दि.३१) झाली आहे.सदर गुन्हा गुरुवारी (दि.०१)रात्री दाखल झाला. फिर्यादी आणि त्यांचे पती रहाते घर लॉक करुन वडगाव मावळ येथे काही कामानिमित्त गेले असता अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे रहाते घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन सुमारे रु. ६,८८७५०/-(सहा लाख अठ्ठयाऐंसी हजार सातशे पन्नास)किंमतीचे २७.५५ ग्रॕम वजनाचे सोन्याचे दागिणे,रु.५०००/ किंमतीचा कॕनन कंपनीचा कॕमेरा रु.४५००/-(रु.चार हजार पाचशे) रोख रक्कम असे एकुण रु. ६,९८,२५०(सहा लाख अठ्ठयांनव हजार दोनशे पन्नास) किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन करीत आहे.