आत्ता माघार नाही : भाजपच्या विराट विजयी संकल्प मेळाव्यात भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांची गर्जना ..!!
मावळ:
शुक्रवार दिनांक २ जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाची भरपूर गळचेपी सहन केली. अगदी गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी सारख्या संस्थांमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून ; हे सर्व असह्य होत आहे. यंदा मावळ विधानसभेवर भाजपचे कमळच फुलणार , आत्ता माघार नाही..!! अशी गर्जना मावळ विधानसभा भाजप प्रमुख रविंद्र भेगडे यांनी भेगडे लॉन्स , वडगाव मावळ येथे संपन्न झालेल्या भाजपच्या विराट विजयी संकल्प मेळाव्यात केली.
आजच्या विजयी संकल्प मेळाव्याला भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची लक्षणीय संख्या बघायला मिळाली. रविंद्र भेगडे पुढे म्हणाले , ” भाजपला मानणारा मोठा मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच मावळ विधानसभेत आहे. इथला परंपरागत मतदार यांची नाळ भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी , कार्यकर्त्यांशी जोडली गेली आहे. आणि त्यामुळेच मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाठवायचा असा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्याचा यंदा निर्धार आहे.”
मावळ विधानसभेत प्रत्येक गावातील भाजप पक्ष संघटन मजबूत करून , रविंद्र भेगडे यांनी आज घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मावळ विधानसभेत महायुती मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आज , पेटलेली ठिणगी अजून किती पेट घेणार हे काळ ठरवणार आहे.
या विजयी संकल्प मेळाव्यासाठी , मा.राज्यमंत्री श्री.बाळा भाऊ भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.गणेश भाऊ भेगडे, कोअर कमिटी अध्यक्ष श्री.निवृत्ती भाऊ शेटे, तालुकाध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ गुंड, तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष श्री.संतोष भाऊ दाभाडे पाटील , मा.सभापती श्री.गुलाब काका म्हाळसकर, मा.उपसभापती श्री.शांताराम बापू कदम, युवा मोर्चा अध्यक्ष श्री.नितीन भाऊ मराठे,महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सायली ताई बोत्रे,लोणावळा शहर अध्यक्ष श्री.अरुण भाऊ लाड, देहूरोड शहर अध्यक्ष श्री.रविंद्र उर्फ लाहूमामा शेलार , वडगाव शहर अध्यक्ष श्री.संभाजी भाऊ म्हाळसकर , देहुगाव शहर भाजपा अध्यक्ष श्री.मच्छिंद्र भाऊ परंडवाल यांच्यासह मावळ विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.