शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…
कोंढवा
वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित हौसाबाई सोपानराव कामठे जुनिअर कॉलेज कोंढवा बुद्रुक या विद्यालयाचा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. तर श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ येवलेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे या विद्यालयाचा कला व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत अर्थात १२ वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.जालींदर कामठे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की यापुढे तुम्ही आता आयुष्याच्या नव्या दालनात प्रवेश करीत आहात, अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही निवडलेल्या मार्गावरही नक्की यशस्वी व्हाल आणि चांगले नागरिक म्हणून नाव कमवाल, त्यासाठी तुम्हाला संस्था विद्यालय व आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच दोन्ही विद्यालयांमधील प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
*प्रतिभाताई पवार माध्यमिक व*
*हौसाबाई सोपानराव कामठे उच्च माध्यमिक विद्यालयाचा*
*बारावीचा निकाल 100% लागला.*
*कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत अनुक्रमे पहिले तीन आलेले विद्यार्थी…*
*कला शाखा 100% निकाल*
1) सरगर ऋतुजा आनंद 88.33%
2) कामठे सिद्धी राजेंद्र 82.33%
3) राठोड शितल कानसिंह 74.67 %
*वाणिज्य शाखा 100% निकाल*
1) विद्या लक्ष्मण गायकवाड 88.33%
2) अविनाश अंकुश साळवी 84.83 %
3) प्राची बापू भोसले
79.67%
वाणिज्य शाखेचा निकाल सातत्याने सलग तीन वर्ष 100% लागला ही विशेष बाब आहे.
*विज्ञान शाखा 100% निकाल*
1) चाचर तनिष्का विकास 82.50 %
2) सूर्यवंशी गौरी पांडुरंग
74.50 %
3) साळवे प्रितेश संपत
70.17 %
वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित
श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ जुनिअर कॉलेज येवलेवाडी तालुका- हवेली जिल्हा- पुणे
एच. एस .सी परीक्षा 2024-25
इयत्ता बारावी वाणिज्य प्रथम तीन क्रमांक..
प्रथम -अन्सारी तहेनूर अल्ताफ78.67%
द्वितीय -राठोड पायल रवी 67.17%
तृतीय -कोकरे दिपाली शंकर 66 .50%
*कला विभाग*
प्रथम -देसाई सुहानी खाशाबा 66.83%
द्वितीय -शेख अमिनाबी सलीम 63.33%
तृतीय- सिद्दिकी अनम मेहेरीन ताहेरखा
61.17%
महाविद्यालयाचा निकाल 100%