आर. एम. डी स्कूल कोंढवा येथे मुलांचे उत्साहात स्वागत ….
कोंढवा पुणे…
आर. एम. डी स्कूल कोंढवा येथे शैक्षणिक वर्ष 2024 25 या वर्षाच्या सुरुवातीला मुलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्याच्या दृष्टीने आनंदाचा व उत्साहाचा असतो.त्यामुळे आर. एम. डी स्कूल कोंढवा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व फुलांचा वर्षाव करून, औक्षण करून शाळेमध्ये स्वागत करण्यात आले.
Advertisement
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती बहुलेकर व सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात मुलांचा शाळेतील स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला.






