*राजू भेगडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त..*

SHARE NOW

मावळ :

जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून अविष्कार सोशल व एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच मळवंडी ढोरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजू लक्ष्मणराव भेगडे यांना प्रदान करण्यात आला.

राजश्री शाहू महाराज स्मारक भवन कोल्हापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व लेखक प्राध्यापक सुरेश कुराडे हे होते,तसेच ज्येष्ठ पत्रकार ताज मुलानी, अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार , मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष शिवाजी कोरवी, अविष्कार फाउंडेशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रंगराव सूर्यवंशी इ. मान्यवरांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला.

Advertisement

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवना विद्यामंदिर चे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, मळवंडी ढोरे शाळेचे मुख्याध्यापक राजू भेगडे, पिंपरी चिंचवड मधील अंजू सोनवणे, अनघा दिवाकर, सुनिता घुले,विजय खेडकर,साधना दातीर इ. शिक्षकांसह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील २८ गुणवंत शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्याची व सामाजिक योगदानाची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात आला.

सदर पुरस्कार सोहळ्यासाठी प्राचार्य पांडुरंग पोटे, लक्ष्मण मखर, भारत काळे, समीर गाडे, गणेश ठोंबरे, युवा उद्योजक दत्तात्रय भेगडे, मोहन शेलार, अतुल भेगडे इ.मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संजय पवार यांनी केले तर आभार दत्तात्रय सूर्यवंशी यांनी मानले.

राजू भेगडे यांना यापूर्वी मावळ तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुणे जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार, काव्यमित्र फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार, हभप दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठानचा गुणवंत गुरुजन पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page