युवा उद्योजक संदीप बंडू बोडके आणि मित्र परिवाराने वृंदावन फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वृद्धांची आणि अनाथांची होणारी परवड थांबवण्यासाठी उभारलेल्या वृंदावन वृद्धाश्रमाचे नुकतेच उद्घाटन संपन्न
मावळ रविवार दि. २० :
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आढले बु. भगतवाडी या ठिकाणी युवा उद्योजक संदीप बंडू बोडके आणि मित्र परिवाराने वृंदावन फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वृद्धांची आणि अनाथांची होणारी परवड थांबवण्यासाठी उभारलेल्या वृंदावन वृद्धाश्रमाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. कै. बंडू दामू बोडके यांच्या स्मरणार्थ हे वृध्दाश्रम स्थापन झाले असून आज समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या मावळ तालुक्यातील आढले या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे, अखिल किसान मोर्चाचे गणेश ( तात्या ) भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब ( अण्णा ) भेगडे यांच्यासह ज्येष्ठ प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी उद्योजक रामचंद्र मधुकर बोरगे आणि युवा उद्योजक युवराज परमेश्वर सुरवसे या विश्वस्थांसह संस्थापक अध्यक्ष संदीप बंडू बोडके यांच्यासह संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब घोटकुले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, सचिन घोटकुले राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पुणे जिल्हा, नितीन घोटकुले अध्यक्ष इको व्हिलेज गोधाम, सरपंच सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले, नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे, नगरसेवक पांडा भाऊ वहिले ,भाजपा नेते तानाजी बारणे, उपसरपंच तानाजी नामदेव घोटकुले, उद्योजक मनोज ढमाले, सरपंच परंदवाडी वसंत पापळ ,उद्योजक गणेश खानेकर, उद्योजक संदीप नवले ,उद्योजक सुनील पवार असेन्तिक फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, उद्योजक हर्षद मोहेकर, उद्योजक प्रशांत हारणे पदमजी हायजिन प्रायव्हेट लिमिटेड, ह.भ.प. बाळासाहेब बोडके, डॉ.ताराचंद कराळे, ह. भ .प .बोरकर महाराज ,उमेश धेंडे सीआयडी पुणे ,रोटरी क्लब निगडी, मावळ ,तळेगावचे सर्व सदस्य, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन टीम महाराष्ट्र राज्य, आरोग्यदुत नवनाथ बोडके यांच्यासह इतर बोडके परिवाराचे स्नेही नातलग व मित्रपरिवार यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील अनेक यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आणि पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मानचिन्ह देवून “मान कर्तुत्वाचा… सन्मान निर्भीड पत्रकारितेचा…! या अनुषंगाने कार्यतत्पर पत्रकार बंधू-भगिनींना सन्मानित करण्यात आले. रक्तदान तसेच मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला.
आजकाल शहरी भागासह ग्रामीण भागात देखील वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. मुलं आपल्या आई वडिलांना घरी सांभाळत नाहीत हीच खरी खंत असुन वृद्धाश्रमांमुळे आई-बाबा नावाचं घरातील हसतखेळत विद्यापीठ नष्ट होत चाललेल आहे .कुटुंब प्रधान संस्कृती विलप्त होत चाललेली आहे. दुभंगलेली नाती आणि विखुरलेले कुटुंब आज समाजाचा खरा चेहरा आता समोर येतो आहे. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची या उक्तीला स्मरून हे बदलण्यासाठी समाजातील युवकांनी आणि युवतींनी पुढाकार घ्यायला हवा.वाढत्या वृध्दाश्रमा बरोबर काही लोकांसाठी हा एक व्यवसाय झाला असला तरीदेखील , या व्यावसायिक व्यवहारी जगात वावरत असताना संदीप बंडु बोडके यांनी सुरू केलेल्या वृंदावन फाऊंडेशन वृध्दाश्रम मध्ये आलेल्या वृध्दांना विनामूल्य सेवा मिळणार आहे. आपलं स्वतः चं राहत घर वृद्धाश्रमासाठी खुले केले असून असे संवेदनशील युवा व्यक्तिमत्त्व समाजात आहेत हे समाजाचे भाग्य म्हणावे लागेल. असे प्रतिपादन मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे यांनी या सेवा भावी कार्याला शुभेच्छा दिल्या व वृद्धाश्रम ही काळाची गरज असुन त्यांची संख्या वाढू नये म्हणून प्रबोधन करणे आवश्यक आहे. असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे आणि गणेश ( तात्या ) भेगडे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक संदिप बंडु बोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी केले.या उद्घाटन प्रसंगी बोडके परिवाराचे अनेक स्नेही मित्रपरिवार व नातलग व परिसरातील व पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक मान्यवर बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सोमराज नाडे यांनी केले .
आदर्श पत्रकार सन्मानाचे मानकरी खालील प्रमाणे:
विलास भेगडे लोकमत,उत्तम ठाकर, दैनिक पुण्यनगरी, सुभाष भोते दैनिक पुण्यनगरी, धनंजय नांगरे मुक्त पत्रकार ,विजय भुसारे पवना समाचार, निलेश ठाकर दैनिक प्रभात प्रजावार्ता, महादेव वाघमारे मावळ 24 तास,अभिषेक बोडके प्रजावार्ता उपसंपादक,
श्री.सुनील साहेबराव शिरसाट ( 5km News ), श्री.राकेश वसंतराव पगारे ( आवाज TV, दैनिक आवाज, सम्राट ) श्री. रमेश युवराज साठे ( उपसंपादक, स्वराज्य रक्षक न्यूज ), श्री. विनय सोनवणे ( सांगावा न्यूज : संपादक ) श्री. देवा भालके ( चॅनलः महाराष्ट्र 18 News ) श्री. सिध्दांत चौधरी ( स्टार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड संपर्क ९ ) श्री. प्रकाश प्रभाकर अनंत ( न्युज मराठी ) श्री. महावीर किसन जाधव ( महाराष्ट्र लोकधारा न्यूज ) ,, सिता जगताप ( स्त्रीशक्ती News ) , रेखा भेगडे ( सतर्क महाराष्ट्र न्युज चॅनेल ), रेश्मा फडतरे ( महाराष्ट्र live ), पराग संतोष डिंगणकर ( पिपीसी न्यूज ), श्री. राजु बबन वारभुवन ( victory Katta ), श्री. मुझफ्फर इनामदार ( वार्ता जगत न्यूज चैनल मुख्य संपादक ), श्री. सचिन गोविंद ठाकर ( लोकमत प्रतिनिधी पवनानगर ), श्रावणी ( चित्रा ), कामत ( क्राईम बॉर्डर ), प्रा. सोमराज सुभाष नाडे ( संपादक, स्वराज्य रक्षक न्यूज, पुणे ), श्री. नितीन मधुकर कालेकर ( एन मराठी न्यूज ), श्री. संतोष गोतावळे ( स्टार २४ न्युज मराठी ), श्री. विकास शामकांत वाजे ( दैनिक लोकमत ) श्री. बानेवार मारुती पिराजी ( राष्ट्रवार्ता न्यूज ), डॉ. मिलिंदराजे भोसले ( संपादक सद्रक्षणाय ), गणेश गुरव पत्रकार सद्रक्षणाय
या सर्व उपस्थित असलेल्या पत्रकारांना कार्यक्रमादरम्यान आदर्श पत्रकार या सन्मानाने सन्मानित करताना बंधू -भगिनी यांना शॉल आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.