इंद्रायणी विद्यामंदिर संचालित श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे या माध्यमिक विद्यालयात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

नवलाख उंबरे :

इंद्रायणी विद्यामंदिर संचालित श्रीराम विद्यालय नवलाख उंबरे ता मावळ जि पुणे या माध्यमिक विद्यालयात दिनांक २१/०६/२०२४रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisement

योग शिक्षक म्हणून शुभारंभ मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन व मांडेलिज प्रकल्पा अंतर्गत प्रोजेक्ट लिड श्री अरुण मोहिते व त्यांची टिम तसेच विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती वैशाली माळी यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून घेतली.कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पुजनाने प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कायगुडे सर व सर्व सहकारी शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाली.योग दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा.निबंध स्पर्धा.चित्रकला स्पर्धा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमास संस्था अध्यक्ष श्री रामदास काकडे.कार्यवाह श्री चंद्रकांत शेटे यांनी शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page