कुणाल ठाकुर यांचा वाढदिवस सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा
तळेगाव दाभाडे: येथील स्वा.वि.दा. सावरकर गुरूकुल येथे अत्यंत आनंददायी वातावरणात कुणाल धीरज ठाकुर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मित्रपरिवार, नातेवाईक तसेच गुरूकुलातील गुरूजन उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण आशीर्वादमय आणि आनंददायी झाले.
कार्यक्रमात केक कटिंग, सत्संग, कीर्तन तसेच आनंददायी भोजन यांचा समावेश होता. सर्वांनी मिळून कुणाल ठाकुर यांना आयुष्यभर उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रजनी ताई ठाकुर यांचा नातू कुणाल (बाबा) ठाकुर यांचा वाढदिवस स्वा.वि.दा. सावरकर गुरूकुल येथे साजरा झाला. या सोहळ्यास माजी नगरसेवक अमोल भाऊ शेटे, शिरोडकर काका, सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश नाना दाभाडे, पत्रकार गणेश भेगडे.सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ ठाकुर व कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कुणाल (बाबा) ठाकुर यांचे काका कै. पै. योगेश भाऊ ठाकुर यांचे सहकारी आणि मित्रपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी माहिती घेणे आणि अन्नदान यासारख्या सामाजिक उपक्रमांचा देखील आयोजन करण्यात आले.






