*इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत मुलींची बाजी विज्ञान शाखेतून मिताली संजय फडतरे प्रथम*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२वी बोर्ड परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या उज्वल परंपरेला साजेसा निकाल यावर्षीही लागला असून विज्ञान, वाणिज्य,कला व तंत्रशिक्षण शाखांतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळविले आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९७.७८टक्के,

वाणिज्य शाखेचा निकाल ९५.१८ टक्के, कला शाखेचा निकाल ७६.६६ टक्के लागला आहे.तंत्रशिक्षण शाखेचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेतून मिताली संजय फडतरे या विध्यार्थिनीने ९४.८३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

वाणिज्य शाखेतून श्रुतिका विकास जाधव या विद्यार्थिनीने ९०.५ टक्के मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

कला शाखेतून कुंदन संदीप बोरे या विद्यार्थ्याने ८६.१७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे

Advertisement

तंत्रशिक्षण विभागातून विनायक मल्लिकनाथ होटकर या विद्यार्थ्यांने ७६.३३गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

इंद्रायणी विद्यालयाचा शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे

विज्ञान शाखा-प्रथम क्रमांक-

मिताली संजय फडतरे द्वितीय क्र.

उन्नती राजेश ठाकूर, तृतीय क्रमांक -आकांक्षा पोपट दाभाडे

वाणिज्य शाखा-

प्रथम क्र.- श्रुतिका विकास जाधव, द्वितीय क्र.-श्रुती प्रकाश गोपाळे,

कृष्णराज धनंजय काशीद,

तृतीय क्र-मयुरा अमोल गरुड

कला शाखा-

प्रथम क्र.- कुंदन संदीप बोरे

द्वितीय-मयुरी निलेशचिलप,

तृतीय क्र. कोमल राजेभाऊ वाघमारे

तंत्रशिक्षण-प्रथम-

विनायक मल्लिकनाथ होटकर

द्वितीय- अथर्व अप्पासाहेब माळी प्रदीप प्रकाश अंकुशी

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे,प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उप प्राचार्य प्रा. संदीप भोसले व सर्व संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page