स्काऊट गाईड पथकाचे योगदान
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीच्या स्काऊट गाईड पथकाने देहू येथे जाऊन वारकऱ्यांसोबत वारीचा आनंद घेत मोठे योगदान दिले. विठू नामाचा गजर करत, तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत निघालेल्या वारकऱ्यांसाठी फ़राळ वाटप करीत, रिंगण, फुगड्या, माऊलीचा गजर, टाळ वाजवत पावसाची संततधार चालू असताना देखील विद्यार्थी सगळेच दंग झाले होते. वाहतूक नियंत्रण करणे, वारकऱ्यांना प्रोत्साहन देणे असा अविस्मरणीय आणि अनोखा अनुभव विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच घेतल्यामुळे खूपच भारावून गेले होते. यशश्री आलम या सहशिक्षकेने उपक्रमाचे नियोजन करुन मार्गदर्शन केले.