ओवळे गावातील रस्ता तत्काळ करून दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शिवभक्त अजित शिंदे यांनी ओवळे गावचे सरपंच दिलीप नाना शिंदे यांचे मानले आभार
ओवळे: दत्ताभाऊ खोंडगे यांच्या घरापासुन ते शिवभक्त अजित भाऊ शिंदे यांच्या घराकडे जाणार्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण झाले पाहिजे.कारण पावसाळ्यात येथील स्थानिक नागरिकांना आपल्या घराकडे जाताना पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने खुप त्रास होत होता व पावसाळ्यात नागरिकांचे रस्त्याअभावी खुप हाल होत होते .त्यामुळे आपण लवकर ह्या रस्त्याचे काम पुर्ण करावा .
अशी मागणी शिवभक्त अजित शिंदे यांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. व पावसाळ्यापुर्वी ह्या रस्त्याचे काम पुर्ण होईल असे गावचे सरपंच-श्री.दिलिपनाना शिंदे व ग्रा.पदाधिकार्यांचा आश्वासन दिले होते .ह्यासाठी ओवळे ग्रामपंचायतीने ह्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे,म्हणुन पाऊस चालु असताना देखील पावसात ह्या रस्त्याचे काम चालु ठेवुन रस्ता पुर्ण केला .त्याबद्दल शिवभक्त अजित शिंदे यांनी व ग्रामस्थांनी ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व ग्रा.पदाधिकार्यांचे आभार मानले.तसेच ह्या रस्त्यासाठी ज्या शेतकर्यांनी आपली जागा दिली.त्या शेतकर्यांचे देखील आभार मानले.