श्री क्षेत्र देहू ते भंडारा डोंगर बससेवेचा प्रारंभ.!

SHARE NOW

देहूगाव :

श्री संत तुकाराम महाराजांच्या ‘जन्मस्थानाला’ आणि ‘तपोभूमीला’ जोडणारी एक नवीन बससेवा सुरू झाली आहे. पुणे परिवहन महामंडळाने ही सेवा सुरू केली असून, आज देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिचा शुभारंभ करण्यात आला

या बससेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता देहू आणि भंडारा डोंगर या दोन्ही पवित्र स्थळांना भेट देणे अधिक सोपे झाले आहे. दिवसभर या बसच्या ७ फेऱ्या उपलब्ध असतील, ज्यामुळे भाविकांना त्यांच्या सोयीनुसार संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ घेता येईल.

या उपक्रमाबद्दल भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज काशीद पाटील आणि मावळ भाजपा नेते रविंद्र आप्पा भेगडे यांनी भाविकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे*

या बससेवेच्या माध्यमातून दोन्ही तीर्थक्षेत्रे जोडली गेल्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे.

Advertisement

ही बससेवा ज्यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू झाली असे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक मा.पंकजजी देवरे साहेब आणि मुख्य वाहतूक व्यवस्थापक मा. सतिशजी गव्हाणे साहेब यांचे श्री क्षेत्र भंडारा डोंगर समितीने व नागरिकाने मनापासून आभार मानले आहेत.*

ही बससेवा केवळ एक वाहतुकीचे साधन नसून, ती अध्यात्मिक आणि धार्मिक श्रद्धेचे एकत्रीकरण करणारा पूल आहे, जो भाविकांना संत तुकाराम महाराजांच्या जवळ घेऊन जाईल असा विश्वास याप्रसंगी बोलतांना बाळासाहेब महाराज काशीद पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी सहकारमहर्षी श्री.माऊली भाऊ दाभाडे,भंडारा डोंगर समितीचे प्रमुख ह.भ.प.बाळासाहेब महाराज काशीद पाटील ,मावळ भाजपा विधानसभा प्रमुख श्री.रविंद्र आप्पा भेगडे, ह.भ.प.नंदकुमार महाराज भसे,पिंपरी डेपो आगार व्यवस्थापक श्री.राजेश जाधव साहेब ,श्री.अनिल रासकर साहेब ,मा.उपसभापती श्री.शांताराम बापू कदम , यांच्यासह श्री क्षेत्र भंडारा डोगर समितीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.!


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page