*स्वामी विवेकानंद स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम*
तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलची एसएससी परीक्षेतील शंभर टक्के निकालाची परंपरा सलग बाराव्या वर्षीही कायम राहीली असून प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.प्रथम क्र.-तेजस्विनी चव्हाण ९३.८०टक्के गुण, द्वितीय क्र.-सुरक्षा कटरे ९३.४०टक्के गुण, तृतीय क्र.- कृष्णा कदम गुण८७.८० टक्के गुण.सचिव मिलिंद शेलार, पर्यवेक्षिका रेणू शर्मा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेचे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः सरावासाठी घेतलेले परिश्रम, वेळोवेळी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानमाला यामुळे आम्हाला हे यश लाभले असे तेजस्विनी चव्हाण हिने आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यशाची अशीच गरुड भरारी घेऊन यापुढेही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्याची इच्छा संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, सहसचिव, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे ,उपाध्यक्ष दादासाहेब उर्हे, सचिव मिलिंद शेलार कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.