एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयात भव्य शिवजयंती उत्सवं साजरा करण्यात आला.
पिंपरी चिंचवड :
एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या द्वारे आयोजित.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व रक्तदान शिबीर एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालयात पार पडले.
*या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.सदानंद भोसले संचालक रा. से .यो.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची प्रमुख उपस्तिथी होती*. डॅा. डी . के. भोसले संस्थापक एस. ई. सोसायटी, डॉ. वृषाली भोसले अध्यक्षा एस. ई. सोसायटी, मा. ऋतुजा भोसले संचालक एस. ई. सोसायटी, मा.प्राचार्या डॉ. रोहीणी जगताप, मा. उप. प्राचार्य कैलास पौळ इत्यादी
मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा सूत्रधारक विशाल मानकर यांनी पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पालखी व ढोल पथकाणे मिरवणूक काढून करण्यात आली.त्यानंतर दीपप्रज्वलन आणि महाराजांची आरती करण्यात आली.विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता,पोवाडा ,सांस्कृतीक गीत, नृत्य प्रस्तुत करण्यात आले व भूमी पौळ या चिमुकलीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित कविता म्हणून सर्वांना मंत्रमुक्त केल.त्यानंतर डॉ. सदानंद भोसले यांनी व्याख्यान केले व छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा होते ज्यांचा काळात राजेशाहीतही लोकशाही होती.महाराजांच्या काळात खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण झाले असे व्यख्यांनातून ते बोलत होते.
प्रसंगी सौ. प्रिया टोटले, सौ. अर्पिता गोस्वामी,सौ. सुनीता तपासे,सौ.सोनाली देशमुख, अभिराजी बाहुलीयन,सौ. उज्वला भारती, सौ. सायली सातोंडकर, श्री. स्वप्नील जाधव, श्री.गजानन वदूरकर,श्री.ॲड. मंगेश खराबे,श्री विक्रम कुशाग्र इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लोखंडे व साक्षी लालगुडे हिने केले व कार्यक्रमाच्या स्वयंसेविका स्मृती मोधे,धनश्री डेंगाळे, स्वाती नेहे व स्वयंसेवक म्हणून मिलिंदराजे भोसले,प्रताप मोहोड, चंद्रकांत जोगदाळे,वैभव सालार, शांतेश, तुषार घिगे, प्रणव काळे, प्रणव सपकाळ, विकास जुनागरे, शुभम पेटकर, रोहित गायकवाड, निखिल क्षीरसागर,अजिंक्य भालके, ओम कापरे, प्रणव काळे, किशोर सुतार, विलास शिंदे, बप्पासाहेब अवंतकर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शेवट विशाल मानकर यांनी राज्यगीत घेऊन केला.